Ticker

6/recent/ticker-posts

पैशासाठी अकोल्यातील आईने विकलं स्वतःच्याच मुलीला ८० हजार रुपयांत

पैशासाठी अकोल्यातील आईने विकलं स्वतःच्याच मुलीला ८० हजार रुपयांत



अकोल्यात आईच्या नावाला काळिमा फासणारी गोष्ट आपल्या स्वताच्या मुलीला आईने विकले असल्याची घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या लोभासाठी आईने आपल्या मुलीला फक्त ८० हजार रुपयातं विकल्याचे लांछनास्पद कृत्य अकोल्यात उघड झाले आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी चार लोकांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे आई या नावाला कलंक लागला आहे. अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात रहिवासी असलेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस स्टेशनला दाखल होती. या तक्रारीनुसार पोलिसांची मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तपास पथके गठित झाले तांत्रिक सहकार्य व सूत्रांच्या माहितीनुसार, मुलीची माहिती हाती लागली. राजस्थान मध्यप्रदेश सीमेजवळ ही बेपत्ता मुलगी असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर खदान पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलीच्या आईने सुरुवातीला आपल्या मुलीला कैलास रामचंद्र घोपे वय २८, राहणार मांजरी, ता. बाळापूर, जि. अकोला याच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर देवीबाई कैलास सावळे, राहणार, अकोट फैल, जि. अकोला, हिच्या मदतीने मुलीला मध्यप्रदेशात पोहोचविण्यात आले. तिथे मानसिंह अर्जुनसिंह चव्हाण, वय ४०, राहणार जलारा, मध्यप्रदेश, याच्याकडून लग्नासाठी ८० हजार रुपये घेतले अन् मुलीला त्याच्या ताब्यात देण्यात आले. अशी माहिती या तपासा मधून बाहेर आली.


 तिच्या आईनेच या अल्पवयीन मुलीला विकल असल्याचं स्षस्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईसह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये ३६३, ३६६, ३७७, ३४ नुसार गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे तर एक जण अजुनही फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले, गुन्हे पथकाचे डिगांबर अरखराव, विजय चव्हाण, रवी डाबेराव, रोहित पवार यांनी केली आहे.  


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या