Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्याबद्दल भटक्या जमातीचे कार्यकर्ते मोहमंद मुन्निवाले सन्मानित

सामाजिक कार्याबद्दल भटक्या जमातीचे कार्यकर्ते मोहमंद मुन्निवाले सन्मानित      


कारंजा : वाशिम जिल्हयातील भटक्या जमातीचे कार्यकर्ते, गवळी समाजाचे लोकप्रिय समाजसेवक तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीचे पत्रकार मोहम्मद लक्ष्मण मुन्निवाले यांच्या सामाजिक कार्या बद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . याबद्दल सविस्तर वृत्त असे की, स्थानिक कारंजा पत्रकार मंच कारंजा कार्यालयात, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद तथा पत्रकार मंचातर्फे सामाजिक कार्य व


 पत्रकारीतेतील यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हाध्यक्ष संजय कडोळे , कारंजा पत्रकार मंच अध्यक्ष दिलीप पाटील रोकडे, सचिव किरण क्षार यांच्या अध्यक्षतेखाली, मोहम्मद लक्ष्मण मुन्निवाले यांचा भव्य सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात . यावेळी निलेश काळे, विजय पाटील खंडार, समिर देशपांडे, हिमंत मोहकर, उमेश अनासाने, चांद मुन्निवाले, विजय गागरे, प्रतिक हांडे, अनिकेत भेलांडे, बंडूभाऊ इत्यादी उपस्थित होते .


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या