Ticker

6/recent/ticker-posts

तृतियपंथी ओळखदिना निमित्त तहसिल कार्यालयात श्रावणी हिंगलाजपूरे सन्मानित

तृतियपंथी ओळखदिना निमित्त तहसिल कार्यालयात श्रावणी हिंगलाजपूरे सन्मानित               


 कारंजा : दि .३१ मार्च 2022 रोजी  आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्ताने, तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी, मा उपविभागीय अधिकारी  कारंजा तथा मतदार नोंदणी अधिकारी, व तहसीलदार कारंजा  तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कारंजा यांचे तर्फे तृतियपंथीयाच्या विशेष शिबिरांचे आयोजन वाशिम जिल्ह्यात प्रथमच कारंजा येथे करण्यात आले होते. यावेळी तहसिल कार्यालय सभागृहात, निवासी तहसिलदार विलास जाधव, नायब तहसिलदार विनोद हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती .यामध्ये कारंजा तालुक्यातील तृतीयपंथी व्यक्तिंचे मतदार नोंदणीचे नमुने भरुन घेण्यात आले. तसेच तृतियपंथीय व्यक्ती ह्या, पौराणिक, ऐतिहासिक काळापासूनच आपल्या समाजाचा एक घटक असल्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहीजे व आम्ही आमच्या प्रशासकिय स्तरावरून त्यांना शासनाच्या सर्वच सोई सवलती देण्याचा प्रयत्न करू असे उपस्थित निवासी तहसिलदार विलास जाधव तथा नायब तहसिलदार विनोद हरणे यांनी आवर्जून सांगीतले . 


तृतियपंथी ओळख दिना निमित्त पुष्पगुच्छ देऊन श्रावणी हिंगलाजपूरे यांचा पुष्पगुच्छ देऊन, कारंजा तहसिल कार्यालयाकडून सत्कार करण्यात आला . तसेच श्रावणी हिंगलाजपूरे यांनी मला वेळोवेळी तहसिल कार्यालयाचे, कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळते असे सांगत आभार व्यक्त केले .यावेळी महसूल कर्मचारी, पत्रकार मंडळी व नागरीकांची उपस्थिती होती .


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या