न्यू इंग्लिश हायस्कूल येथे 'अटल टिंकरिंग लॅब'चे उद्घाटन संपन्न
केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंब लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडू शकतील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रीहरी मांडवगणे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.तसेच रोबोटिक्स व नवीन संकल्पना याबद्दल ची माहिती उपस्थितांना दिली.
संशोधनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी व सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अकोला शहरातील खासगी अनुदानित शाळांमधून न्यू इंग्लिश हायस्कूल ची निवड करून येथे अटल टिकरिंग लॅब शाळेच्या मुख्याध्यापकांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकार कडून मंजूर करण्यात आली त्या बद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ सुचिता पाटेकर यांनी अभिनंदन केले .
विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स या संकल्पनेवर आधारित या टिंकरिंग लॅब द्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थ्यांनी रोबोची निर्मिती केली आहे.
तसेच या प्रयोगशाळेत संशोधनासाठी आवश्यक विविध साहित्य, उपकरणे बसविण्यात आली आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर, रोबोटिक्स,ड्रोन कॅमेरा इ आधुनिक साहित्य उपलब्ध आहे.शाळेचे मुख्याध्यापक श्री माधव मुन्शी यांनी निती आयोगातर्फे सरकारच्या या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात देशातील एक हजार शाळांची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातील ११६ शाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षण देणाऱ्या न्यु इंग्लिश हायस्कूल ची यात निवड करण्यात आली असून वीस लाख रुपये मंजूर करून ही आधुनिक टिंकरिंग लॅब उभारण्यात आली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी होईल अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन कु मुंडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अटल टिंकरींग लॅब चे प्रभारी श्री कोल्हेकर सर यांनी केले,या प्रसंगी अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब मांडवगणे, कार्याध्यक्ष श्री विलास देशपांडे, सचिव प्रा.श्रीकृष्ण अमरावतीकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, निमंत्रित विशेष अतिथी गण,पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या