चौधरी क्लासेस च्या परीक्षा मंडळाचा गलथान कारभार
परीक्षार्थीना एक दिवस आधी परिक्षा केंद्राची माहीती, ती सुध्दा चुकीची
चौधरी कोचिंग क्लासेसची जूईई - निट परीक्षेचा गलथान कारभार पहावयास मिळाला. सेन्ट अॅन्डस शाळा परीक्षा केंद्र नाही असे परीक्षार्थीना ऐनवेळी समजले. परीक्षा केंद्र बदलण्याची वेळ आल्याने परीक्षार्थीची प्रचंड तारांबळ उडाली होती. एकाच पेपर पुरते हे तात्पुरते उपकेंद्र देण्यात आले आले होते. परीक्षा केंद्र देण्यापुर्वी चौधरी क्लासेस कडुन केंद्रासंदर्भातील सर्व माहिती घेवूनच परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा होती. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी आपल्या आवडीनुसार विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्राची निवड केली होती, परंतु ज्या मुलांनी सेन्ट अॅन्डस शाळा निवडली होती त्यांच्यावर मात्रा फार कठीण प्रसंग आला होता. जेंव्हा विद्यार्थी केंद्रावर पोहचली तेंव्हा ही सेंट अॅन्स शाळा सेंटर रद्द करण्यात आली आहे असे समजले. सेन्टेन्स सेंटर रद्द करण्यात आली हे काही मुलांना क्लासेस मार्फत फोन करून कळविण्यात आले होते. सेंटर सेन्ट अॅन्डस ऐवजी परीक्षेसाठी चौधरी क्लासेसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे समजताच सर्व पालक व विद्यार्थिंची यावेळी तारांबळ उडाली होती.
बऱ्याच विद्यार्थ्यांना चौधरी क्लासेस कुठे आहे हे सुद्धा माहीत नव्हते. त्यांचा बराच वेळ निघून गेला त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी उशिरा पोहोचली. परीक्षेसाठी जो अभ्यास विद्यार्थी करून आले होते या गोंधळामध्ये त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, त्यामुळे विद्यार्थी परीक्षा व्यवस्थित पार पाडू शकले नाहीत. आधीपासूनच विद्यार्थ्यांना सर्व व्यवस्था व अन्य क्षमता तपासून परीक्षा केंद्र दिले जाते. विद्यार्थ्यांना मोबाईल वर मेसेज द्वारे प्रवेश पत्र व संबंधीत परीक्षा केंद्राचे नाव व परीक्षा केंद्र क्रमांकही दिला गेला होत. प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्र गृहीत धरुन विद्यार्थी सरळ परीक्षा केंद्रावर गेली होती. चौधरी क्लासेस च्या संचालकांनी या केंद्रावर परीक्षार्थी परीक्षा देतील असे नियोजन केले होते. प्रत्यक्षात परिक्षा केंद्रच रद्द करण्यात आल्यामुळे परीक्षार्थी व पालकांना अडचणीचा सामना करावा लागला. मात्र कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी यावर कोणतीच हालचाल व बदल केला नाही. सेन्टे अॅन्स शाळेजवळून चौधरी कोचिंग क्लासेस चे अंतर चार ते पाच किलोमीटर आहे , यासाठीही क्लासेस कडून कुठलीही व्यवस्था करण्यात आली नोहती. विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे झालेच नाही. आज विद्यार्थी जेव्हा परीक्षा देण्यासाठी केंद्रावर येणे सुरू झाले. तेव्हा परीक्षा केंद्र येथे नसून चौधरी कोचिंग क्लासेस येथे असल्याचे समजल्याने विद्यार्थी व पालक चक्रावून जात होते. धावत पळत परीक्षा केंद्र गाठवण्याची लगबग झाली होती. सेन्ट अॅन्स शाळेपासून कोणताही ॲटो व अन्य वाहन मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे वाहन नसणा॰या परीक्षार्थ्यांना वाहन त्रास सहन करावा लागला.
परीक्षा व्यवस्थापनाच्या नियोजनाचा अभाव व गलथान कारभाराचा हा कहर आज अकोल्यात पहावयास मिळाला. जर क्लासेस व्वस्थापनाला आधीपासूनच माहीत होते की ही शाळा परीक्षा केंद्र राहणार नाही तर क्लासच्या संचालकांनी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या गेलेल्या वेळेचा व परीक्षेच्या वेळी असलेल्या मानसिकतेचा कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी त्यांच्या परीक्षेच्या गुणांवर काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा केला नाही का? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला आधार देण्यासाठी काय करता येईल? यासाठी पालकांचे लक्ष लागले आहे. जेईई - निट सारख्या परीक्षेत भविष्य घडविण्याचे काम करणाऱ्या कोचिंग क्लासेस मुलांना कशा प्रकारचे नियोजन शिकवेल हे देवच जाणे.
अशा प्रकारचा गलथान कारभार चौधरी कोचिंग क्लासेसच्या व्यवस्थापनाकडून आज पहावयास मिळाला, योग्य नियोजन नाही व खबरदारी घेण्याचे सौजन्य दाखवले जात नसल्याचाच प्रकार यानिमित्ताने पहावयास मिळाला.
0 टिप्पण्या