राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चर्चासत्रचे आयोजन अकोल्यात
नागरिकांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
अकोला --शिक्षण हे देश घडवण्याचे साधन आहे, शिक्षणा मुळे स्वताची, राज्याची व देशाची प्रगती होते.
गुणवत्तापुर्ण व मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सरकारची आहे.आता लागु केलेले राष्ट्रीय शिक्षणधोरण २०२० हे आपल्यासाठी हितकारक आहे की अन्याय कारक ? हे समजून घेण्यासाठी येथील जिजाऊ वसतिगृह, मराठा सेवा संघ कार्यालय, जुना आर.टी.ओ ऑफिस समोर मुर्तिजापुर रोड, अकोला येथे २६ व २७ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.ते सायं.०५ वा.पर्यंत या वेळेत राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे . या चर्चा सत्राला जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
या चर्चासत्र चे उद्घाटन शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ ते १.३०ला सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष UGC) हे करतील तर अध्यक्षस्थानी विजय कौसल हे असतील आणि स्वागताध्यक्ष खान मोहम्मद अजहर हुसेन, प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रशांत गावंडे, प्रा.डॉ.एस जी चापके,.प्रा. प्रकाश डवले,. प्रा.प्रदिप चोरे अशोक पटोकार , प्रो.डॉ.वर्षा सुखदेवे, समिती सुरज मेश्राम, प्रा.रेणुकादास उबाळे (तुमसर), डॉ.विजय ताले हे विचार मांडतील यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गजानन देशमुख,.अॅड. विलास वखरे, प्रा डॉ.ममता ताई इंगोले, शिलवंत डोंगरे हे असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. आंबेडकरांचा शिक्षण विचार या विषयावर प्रा.श्रीकांत काळोखे (अहमदनगर) हे विचार प्रकट करतील या सत्राचे अध्यक्ष डॉ.पुरषोत्तम तायडे हे असतील यावेळी हमिद हुसैन शेख अनवर,. गजानन हरणे, सुमय्या अली, रामभाऊ ताजणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. रविवार दिनांक २७ मार्च २०२२ला राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० प्राथमिक शिक्षणाचे भवितव्य या विषयावर रमेश बिजेकर (नागपुर), राम शेगोकार, मुफ्ती अशफाक कासमी, संदीप बाजारे, दिलीप कडु, राजेश भिमकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, उच्च शिक्षणावरील परिणाम या विषयावर संतोष सुरडकर (गडचिरोली) आणि शशिकांत गायकवाड, सैय्यद जव्वाद हुसैन,पंकज जायले, सुरेश मडावी, सारंग निखाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर संविधान आणि राष्ट्रिय शिक्षण धोरण २०२० या विषयावर होत असलेल्या सत्राची
अध्यक्षता व प्रमुख वक्ते प्रा.डॉ. अनिल सदगोपाल शिक्षण तज्ञ (भोपाळ) हे विचार मांडतील तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून : प्रा डॉ.संतोष हुसे सर, अॅड.सुनिल गजभिये प्रभाकर झोड, .डॉ. जीशान हुसैन, प्रा.प्रदिप चोरे यांची असेल त्यामुळे दोन दिवस चालणाऱ्या वैचारिक कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकरवादी विचार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० राष्ट्रीय चर्चा सत्रचे आयोजक यांनी पत्रकार परिषदेत केले आहे . यावेळी खान मोहम्मद अजहर हुसैन, प्रशांत मेश्राम , शेगोकार गुरुजी,सुमय्या अली,डॉ संतोष हूशे ,प्रशांत गावंडे, ,सूरज मेश्राम यांची उपस्थिती होती
0 टिप्पण्या