बार्शीटाकळी तालुक्यात गणित अध्यापक मंडळ कार्यकारिणी जाहीर
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यामध्ये गणित विषयाच्या सर्व शिक्षकांनाशी समन्वय साधून गणित विषयांमध्ये प्रगती घडून आणण्याकरिता नुकतेच तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर विठ्ठलराव हुरसाळ सरांची अध्यक्ष पदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी श्री प्रमोद बोंद्रे सरांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सय्यद मुतज्जीर जमाल सर यांची सचिव पदी निवड करण्यात आली. श्री डी एन कावडे सर कोषाध्यक्षपदी नियुक्त झाले. श्री पल्हाडे सर हे सहसचिव म्हणून नियुक्त झाले. श्री चंद्रकांत गव्हाणे सर समन्वयक या पदी निवड झाले. तसेच मंडळ तालुका ज्येष्ठ सल्लागार म्हणून श्री पल्हाडे सर, श्री कोल्हे सर, श्री अस्वार सर, श्री नंदाने सर, श्री आर एन कांबळे सर, श्री रोशन वाढई सर, श्री आहेकर सर, श्री जढाळ सर, श्रीमती शेळके मॅडम ची नियुक्ती करण्यात आली. श्री प्रवीण बुटे सर यांची तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून श्री एम के देशमुख सर, श्री महादेव चौधरी सर, श्री वगोर सर, श्री उमेर अहमद सर, श्रीमती सीमा तायडे मॅडम यांची निवड करण्यात आली.



0 टिप्पण्या