गायन सम्राट लताताई मंगेशकर यांच्या निधनाने देशाची व महाराष्ट्राची फार मोठी हानी -माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे
अकोला
महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती सोबत कला-संस्कृती मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गायन सम्राट लताताई मंगेशकर यांच्या निधनाने देशाची व महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तसेच महापुरुषांच्या व वेगवेगळ्या पेरणादायी गाण्यातून व समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने महाराष्ट्राची नव्हे तर जागतिक स्तरातील कला क्षेत्राची फार मोठी हानी अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.
मंगेशकर परिवार यांचा देशभक्ती व कला क्षेत्रा संस्कृती संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असून समाजाला दिशा देण्याचे काम व वेगवेगळ्या सप्तसुर त्या माध्यमातून आजा अमर आपल्या कला गुणाने झालेल्या लताताई मंगेशकर महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्थळातील भूषण होते वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी गीत स्वरबद्ध करून चेतना जागृतीचे कार्य केले आहे त्यांच्या निधनाने न भरून निघणारी हानी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे महापौर अर्चनाताई मसने महानगराध्यक्ष विजय अग्रवाल काजल राऊत पद्माकर मोरे यांनी सुद्धा आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या