भाजपा शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष चा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
स्थानिक जि प अध्यक्ष यांचे निवासस्थानी भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडी चे तेल्हारा तालुका अध्यक्ष बाळकृष्ण प्रल्हाद अरबट यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी अशोकभाऊ दारोकार, जि प सदस्य शंकरराव इंगळे, मनोहर बनसोड,बबलु शिरसाट, गणेश पाळसुटकर,सुरेश कलोरे, डॉ गोंड, श्रीकृष्ण देवकुणबी आदी उपस्थित होते.
असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या