Ticker

6/recent/ticker-posts

६४ सागवान झाडे भुमिअभिलेख व वनविभागाच्या संगनमताने तोडली, उपोषणाचा आज चौथा दिवस

 ६४ सागवान झाडे भुमिअभिलेख व वनविभागाच्या संगनमताने तोडली, उपोषणाचा आज चौथा दिवस



नवेगाव पातुर (आलेगाव) येथील वनजमीनीवर अवैध अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांने स्वताच्या शेत सर्व्हेची बनावट 'ब' पत्रके बनवून वनविभागाचे ६४ सागवान झाडे भुमिअभिलेख व वनविभागाच्या संगनमताने तोडली. या व्रुक्षतोडीची तक्रार वनविभागात सेवा देणाऱ्या वनाधिकारी व पदस्थ उपसंरपंचाने करुन दोषींवर कारवाईची मागणी केली.या वनगुन्हात बनावट दस्तऐवज, तोडलेला माल, सहा. उप वनसंरक्षकांनी वाहतूकीसाठी केलेली हँमरिंग, हँमरिंग खोडणे हे दखलपात्र गुन्हे असतांना यात FIR तर सोडा POR सुद्धा न फाडता दोषीना संरक्षण दिल्या गेले. तक्रारदार या बाबत गत ९ महिण्यापासून न्याय मागत असता सरते शेवटी दि.22 डिसेंबर 21 पासून आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला. उप वनसंरक्षक या संपूर्ण प्रकरणात केवळ बघ्याची भुमिका घेत होते. दि 22 पासून तक्रारदार आमरण उपोषणास बसले असता वरिष्ठांनी याची दखल घेतली असता उपसंचालकांनी आता धावपळ सुरू करत आहेत. जरी उपवनसंरक्षक हे भावसे असले तरी पुर्वाश्रमी असलेल्या सहा.वनसंरक्षकाच्या भुमिकेतुन बाहेर पडतांना दिसत नाही. त्यांचे काही पदनस्थ आधिकारी जाणीवपूर्वक महत्वपूर्ण फाईल्स गायब करुन चुकीची माहिती देत असून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे. उपोषण कर्त्यांना वेळखाऊ धोरणाच्या अनुषंगाने सहकार्य करण्याची गळ घातली जात आहे. आता शासकीय वनजमिन सर्व्हे क्र.40 ही 6.31 हेक्टर जमीन वनविभागाच्या नावे असतांना व वनकायद्यानुसार सिमांकन पिल्लर, चर व वनक्षेत्र दर्शक चिन्हे असतांना सर्व्हे क्र मोजणीची गरज काय? मोजणीमध्ये जागेच्या क्षेत्रफळात थोडाफार फरक असू शकतो परंतु या वनजमिनीवर असलेल्या व्रुक्षसंख्येत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. हे वनविभागाचे कैक दशके जतन केलेले मौल्यवान सागवान झाडे संगनमताने बनावटी स्थिती निर्माण करून तोडली गेली हे सप्रमाण सिद्ध झाले. आज संघटितपणे गुन्हासाठी तयार केलेली पार्श्वभूमी, केलेला गुन्हा, गुन्हेगार, जप्त माल याचे पुराव्यानिशी सिद्धता झाल्यानंतरही कारवाई न करणे व आता गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच खेल होबे. उवनसंरक्षक साहेब जे सिद्ध आहे त्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा व ईतर किरकोळ बाबी चौकशी ठेवून उपोषणकर्त्यांना न्याय द्या.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या