Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर पश्चिम-उत्तर मंडल च्या वतीने अटलजी यांची जयंती निमित्त सुशासन दिन साजरा

भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर पश्चिम-उत्तर मंडल च्या वतीने अटलजी यांची जयंती निमित्त सुशासन दिन साजरा 


आज माननीय  खासदार संजयजी धोत्रे , भाजपा  जिल्हाध्यक्ष रणधिरभाऊ सावरकर,आमदार गोवर्धनजी शर्मा, भाजपा शहरअध्यक्ष विजयजी अग्रवाल ,आमदार वसंतजी खंडेलवाल, महापौर अर्चनाताई म्हसने यांच्या मार्गदर्शनाखाली ,भाजयुमो शहराध्यक्ष उमेशजी गुजर यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम-उत्तर मंडल तर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती दिना निमित्त  त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन त्यांच्या स्वलिखीत कवितांचे वाचन करण्यात आले व तसेच अकोला शहर शासकीय कार्यालयांमध्ये अटलजींची प्रतिमा भेट देण्यात आली .यावेळी  पश्चिम-उत्तर मंडल अध्यक्ष वैभव मेहरे, निलेश निनोरे,गोपाल पाटिल,आदित्य वानखडे,विशाल मुधलकर, आशीष डोरले,दत्ता सरोदे,आकाश निपारे,सागर बोरखड़े,सुमित चांगले,सोनू वाडेकर,श्रीकांत ढोपले,नंदकिशोर ठाकरे,पंकज फूलकर,मंथन संगदे ,श्याम विंचानकर इत्यादि उपस्थित होते.


भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त "सुशासन दिवस " साजरा करण्यात आला


माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, युवा नेते अनुप धोत्रे, महापौर सौ अर्चनाताई मसने , तेजराव थोरात, किशोर मांगटे, जयंत मसने,माधव मानकर, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर, महानगर सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर, डॉक्टर विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा, संजय गोटफोडे, योगेश मानकर पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती 'सुशासन दिन' म्हणून साजरी करण्यात आली

याप्रसंगी अकोला रेल्वे स्थानकातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा अटलजी यांची प्रतिमा देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

महानगराध्यक्ष श्री विजय अग्रवाल यांनी अटलजींच्या जीवनावर प्रकाश टाकला व सर्व उपस्थितांना अटलजींच्या तत्वावर चालण्याचा आग्रह केला, अटलजींच्या नेतृत्वात भारताला पारदर्शी सरकार लाभली व देशाचा विकास झाला असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी सर्व उपस्थितांनी  ख्रिस्ती बांधवांना व भगिनींना नाताळाच्या शुभेच्छा महापौर अर्चना ताई मसने यांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत अटलजींच्या सरकारमध्ये महिलांना प्रमुख स्थान त्यांनी दिले होते व महिलांच्या कल्याणाच्या अनेक योजना अटलजींच्या कार्यकाळात सुरू झाल्या व त्या माध्यमातून आजही यशस्वीपणे लाखो महिलांना न्याय देत आहेत असे प्रतिपादन केले. या प्रसंगी अकोला रेल्वे स्थानकाचे प्रबंधक ए एस नांदुरकर, मोहम्मद यामिन अन्सारी संजय इंगळे अब्दुल मुस्ताक,बी आर धाकडे,व्ही आर नंदेश्वर, एस डी कवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते अटलजी यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चाईल्ड हेल्प लाईन चे पदाधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला 

सर्व उपस्थितांनी अकोला रेल्वे च्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचे स्वछता , सुशासन , राखल्याबद्दल विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अटलजींच्या कवितांचे वाचन मातृशक्ती द्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला पूर्व मंडळाचे सरचिटणीस संदीप गावंडे आकाश ठाकरे, अभिजीत कडू, केशव हेडा ,सौ निकिता देशमुख सौ वर्षा गावंडे,गट नेते राहुल देशमुख, नगरसेवक मिलिंद राऊत अनिल मुरूमकर आशिष पवित्रकार सुभाष खंडारे, सौ आरती घोगलिया प्रशांत आवचार अनिल नावकार संदीप शेगोकार प्रकाश घोगलिया,अक्षय जोशी जस्मितसिंग ओबेरॉय, शुभम चंदन,,शीतल जैन, रवी जैन, रुपेश लोहकपूरे, क्रितेश अग्रवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले व संचालन अभिजीत कडू यांनी केले आभार व केशव हेडा यांनी मानले

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुशासनचा नारा 


अकोला
जनसंघ ते भाजपा निर्माण कार्यात व पक्षाचे विचार घरोघरी पोचवणारे राष्ट्रभक्त, कवी साहित्यकार समाजसेवक भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुशासन चा नारा देऊन कृती मध्ये कार्य करून संसदीय परंपरा चा पालन करून देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण करणारे कार्यकर्ते तयार करून हिंदुस्थानचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणे नमन करणे त्यांचे विचार अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पार्टी कार्यालयात खासदार संजय धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, तेजराव थोरात महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात आज जिल्हाभरात वेगवेगळ्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयात जनसंघ ते भाजपा कार्य करणाऱ्या व मीसाबंदी मध्ये जेलमध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात हे होते. मंचावर महापौर अर्चनाताई मसने, गिरीश जोशी माधव मानकर, केशव ताथोड, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा पाडीयासंजय गोडफोडे, जयंत मसने, पवन पाडीया हरिभाऊ काळे, अभिमन्यू नळकांडे आधी विराजमान होते.
यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर या यांच्या मार्गदर्शनात मीसाबंदी चे कार्यकर्ते सिद्धेश्वर देशमुख पुरुषोत्तम खोत गजानन नळकांडे पद्माकर देशमुख मोहन गावंडे देविदास मुहेकर दिगंबर  मसतुद आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कवितेचे वाचन सामूहिकरीत्या करून त्यांना नमन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात साडेतीनशे ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होताहे सुशासन दिन देशभरात साजरा होत असून वेगवेगळे कार्यक्रम भाजपा तसेच विविध आघाडीच्यावतीने संपन्न होत आहे. खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा यांनीसुद्धा अटलजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नमन केले.अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी मुंबई प्रदेश कार्यालयात जाऊन अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून नमन केले


डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर 


अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी ची तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जन्मदिवशी व गुरु पर्व त्यादिवशी महत्वाची भेट देशवासीयांना दिली असून पंधरा ते अठरा वर्षे लहान मुलांना देण्याचा निर्णय 3 जानेवारी पासून घेतला तसेच हेल्थ आरोग्य क्षेत्रामध्ये व पोलीस कर्मचारी सफाई कामगार सेवा प्रदान करणाऱ्या सर्वांच्या साठी तिसरा डोस 10 जानेवारी तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करून देशाच्या नागरिकांच्या  आरोग्याच्या काळजी घेण्याचा निर्णय, तसेच कोणती अफवांना बळी न पडता शतप्रतिशत covid-19 ची लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान पंतप्रधानांनी देशवासीयांची संवाद साधून केल्याबद्दल सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व सरकारच्या निर्णयाचा स्वागत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास व देशातील वैज्ञानिकांचा आरोग्यसेवा तसेच फ्रंटलाईन व वर्कर्स  यांचा गौरव करण्याचा मोठा पणा  दाखवल्याबद्दल पंतप्रधानांची चे स्वागत माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी केला आहे.





अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या