Ticker

6/recent/ticker-posts

ग्रा.पं. रिक्त पदांची पोटनिवडणूक:जिल्ह्यात नागरिकांच्‍या मागासवर्ग प्रवर्गाच्‍या २६ जागांची निवडणूक‍ स्थगित

ग्रा.पं. रिक्त पदांची पोटनिवडणूक:जिल्ह्यात नागरिकांच्‍या मागासवर्ग प्रवर्गाच्‍या २६ जागांची निवडणूक‍ स्थगित


 अकोला, दि.७(जिमाका)-मा.राज्‍य निवडणूक आयोगाचे निवडणूक कार्यक्रम पत्र दिनांक 17/11/2021 अन्‍वये निधन, राजीनामा,अनर्हता किंवा अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्‍यात यावयाचा प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्‍हयातील २०० ग्रामपंचायती मधील ४०३ रिक्‍त पदाच्‍या पोट निवडणूकां करिता निवडणूकीची नोटीस दिनांक 22/11/2021 रोजी प्रसिद्ध करण्‍यात आली होती.


            मा.सर्वोच्‍च न्‍यायालयात विशेष अनुमती याचिका 19756/2021 मधील दिनांक 06/12/2021 रोजी झालेल्‍या आदेशानुसार नागरिकांच्‍या मागासवर्ग प्रवर्गाच्‍या जागांच्‍या निवडणूका स्‍थगित ठेवण्‍याबाबत मा. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने आदेशित केले आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणी असे ही आदेशित केले आहे की, या निवडणुकांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरु ठेवून पूर्ण करण्‍यात यावी, याबाबत निर्देश आहेत. तसेच मा.राज्‍य निवडणूक आयोगाचे निवडणूक कार्यक्रमानुसार जाहीर करण्‍यात आलेल्‍या नागरिकांच्‍या मागासवर्ग प्रवर्गासाठीच्‍या रिक्‍त जागाची पोट निवडणूक आहे त्‍या टप्‍प्‍यावर तात्‍काळ स्‍थगित करण्‍यात येत असल्‍याबाबत मा.राज्‍य निवडणूक आयोगाचे दिनांक 7/12/2021 रोजीचे संदर्भीय पत्रानुसार आदेशित केले आहे.
त्यानुसार ,अकोला जिल्ह्यात खालील प्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्य्ळा २६ जागांवरील पोटनिवडणूक कार्यक्रम स्थगित होईल,असे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जिप/पंस/ग्रापं निवडणूक विभाग अकोला संजय खडसे यांनी कळविले आहे.
 त्याचे विवरण याप्रमाणे-


अ.क्र. तालूका नामाप्र
1    तेल्‍हारा        0
2   अकोट        10
3    मुर्तिजापूर    8
4    अकोला       1
5    बाळापूर       3
6   बार्शिटाकळी  3
7   पातूर            1
     एकूण  7       26

            त्‍यानुसार मा.राज्‍य निवडणूक आयोगाचे निवडणूक कार्यक्रमानुसार जाहिर करण्‍यात आलेल्‍या अकोला जिल्‍हयातील नागरिकांच्‍या मागासवर्ग प्रवर्गासाठीच्‍या रिक्‍त जागाची पोट निवडणूक आहे त्‍या टप्‍प्‍यावर पुढील आदेशापर्यत स्‍थगित करण्‍यात येत आहे. याबाबत सर्व तहसीलदारांना सुचित करण्याट आले असल्याचेही खडसे यांनी कळविले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या