Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी कार्यालय आज संताजी महाराज व गुरु तेग बहादुर सिंह यांची जयंती

भारतीय जनता पार्टी कार्यालय आज संताजी महाराज व गुरु तेग बहादुर सिंह यांची जयंती



युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वेठीला; 
ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा द्यावा
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी


राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री व आ. आशीष शेलार , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. 

श्री. पाटील यांनी यावेळी नवी मुंबईत वाशी येथे सोमवार ६ डिसेंबर रोजी महावितरण चे अधिकारी एका बैठकीत महावितरण च्या कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी 'वरून दबाव ' आहे तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही 'फळ' मिळेल अशा भाषेत महावितरण चे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी  कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकाऱ्यांना जाब ही विचारला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करावयाचे आहे याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे श्री . पाटील यांनी नमूद केले. 

श्री. पाटील यांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरण ची यंत्रणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला.
मुकुंद कुलकर्णी
(कार्यालय सचिव)


भारतीय जनता पार्टी कार्यालय आज संताजी महाराज व गुरु तेग बहादुर सिंह यांची जयंती


अकोला
भारतीय जनता पार्टी कार्यालय आज संताजी महाराज यांची जयंती तसेच गुरु तेग बहादुर सिंह यांची जयंती राम जानकी विवाह निमित्य पूजा-अर्चना करून अभिवादन  करण्यात आले
संताजी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांची तुकाराम गाथा व साहित्य उपलब्ध करून देऊन आपल्या सिद्धहस्त लेखणीतून समाजाला प्रबोधन   मार्गदर्शन केले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सर्वश्रीआ गोवर्धन शर्मा, आ रणधीर सावरकर, तेजराव थोरात , विजय अग्रवाल, जयंत मसने,माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, गिरीश जोशी, राजेंद्र गिरी, संजय बडोणे, शंकरराव वाकोडे, विजय सोळंकी,हरिभाऊ काळे, ऍड देवाशिष काकड, प्रवीण हागावणे, मोहन पारधी, तुषार भिरड,, अजय शर्मा, विजय इंगळे, योगेश गोतमारे, वैभव मेहरे,  विजय जाधव, अभिजित कडू, शिवम ठाकूर, दिलीप भरणे, दिलीप पटोकर, मंगेश गमे, विशाल गमे, केशव हेडा, प्रफुल खरात, अभिमन्यू नळकांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या