बलोदे दे आऊट लहरिया नगर कौलखेड भागातील रस्ते रस्त्यांचे भूमिपूजन समारंभ
अकोला
अकोला शहराचा विकास तसेच सामाजिक एकतेचा व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येकाचा आदर सन्मान पदाचा अभिमान न करता प्रत्येकाचा गौरव व अकोले करांचा विश्वास सतत कायम ठेवून आमदार शर्मा, खासदार धोत्रे कार्यरत असल्याचा प्रत्यय असल्यामुळे भाजपावर अकोलेकर प्रेम करीत असल्याचे प्रतिपादन अकोला भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले.
आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग 19 मधील बलोदे दे आऊट लहरिया नगर कौलखेड भागातील रस्ते रस्त्यांचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती संजय बडोणे हे होते.
यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महापौर सौ अर्चनाताई जयंत मसने, उप -महापौर राजेंद्रजी गिरी , सभापति संजयजी बड़ोणे,सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर ,दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री गगेश अंधारे,नगरसेवक सौ.मंगल सोनोने , सौ योगिता पावसाळे ,धनंजय धबाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी राजेश रेड्डी , रमण पाटिल ,प्रफुल कानकिरड , सिद्दर्थ उपर्वट , राजु मिश्रा ,मनमोहन दुबे , राजेश बैस , तसेच नागरिक मोठ्या संखेने उपस्तित होते.
0 टिप्पण्या