रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंजवळ मांडल्या रेल्वे विषयक महत्वपूर्ण मागण्या
आज रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हावरा मुंबई मेलने नागपूरहून अकोल्याला जात असताना मेल वेळेआधी एक तास बडनेराला पोहचली. रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण बडनेरा स्टेशनची पाहणी केली. रेल्वे प्रवाश्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या प्रसंगी रावसाहेबांचे स्वागत करून बडनेरा व अमरावतीच्या अनेक समस्या त्यांच्याजवळ मांडल्या. या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.
1. बडनेरा स्थानकावरचे दोन एसकेलेटर ( स्वयंचलित जिना ) नेहमी बंद असतात. ते सुरू ठेवण्यात यावे.
2. सर्वाधिक गर्दी होणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर देखील एसकेलेटर लावण्यात यावे.
3. अमरावती - बडनेरा रेल्वे मार्गावर जुनीवस्ती येथे निर्माणाधिन पुलासोबत बारीपुऱ्यातील स्मशानात जाण्यासाठी प्रशस्त भुयारी मार्ग बांधण्यात यावा.
4. हावरा - शिर्डी, पुरी - सुरत आणि नागपूर - मुंबई दुरांतो या गाड्यांना बडनेरा येथे थांबा देण्यात यावा.
5. अमरावती साठी टाकलेल्या कॉर्ड लाईन ऐवजी सर्व गाड्या बडनेरा स्थानकावर आणण्यात याव्या.
6. बडनेरा येथे होत असलेल्या रेल्वे वॅगन फॅक्टरीच्या कामाला अधिक गती यावी, यासाठी आपण स्वतः एकदा भेट द्यावी, अशा मागण्यांची विनंती रावसाहेबांना केली.
या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत यासबंधीचे प्रस्ताव पाठवण्याचे व तात्काळ कारवाईचे निर्देश रावसाहेब दानवे यांनी सोबतच्या अधिकाऱयांना दिले.
- शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
0 टिप्पण्या