अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या विरुद्ध फौजदारी संहिता 156 (3 ) अंतर्गत प्रकरण अकोला न्यायालयात दाखल
बनावट दस्तऐवज बनवून शासन निधीचा अपहार आणि भ्रष्टचार केल्याबद्दल अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बच्चू भाऊ कडू यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक अकोला व पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडे तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने पक्षकाराच्या वतीने न्यायालयात खासगी याचिका दाखल करण्यात आली आहे. Akola Case Cri.M.A./2071/2021 या याचिकेवर आज सकाळी ११ वाजता सुनावणी झाली.
मा न्यायालयाने या संदर्भात १ जानेवरी २०२२ रोजी अधिकचे कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवक्ता ऍड. आशिष देशमुख हे फिर्यादी च्या वतीने कामकाज बघत आहेत.
0 टिप्पण्या