केंद्राच्या शालेय शिक्षण, साक्षरता विभागामार्फत देशभरात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS)
केंद्राच्या शालेय शिक्षण, साक्षरता विभागामार्फत देशभरात १२नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS)केले जाणार आहे.यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यभरातील शिक्षण संचालक,उपसंचालक,शिक्षणाधिकरी प्राचार्य व संबंधितांची सर्वेक्षण तयारीबाबत बैठक घेतली.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेतील आरोग्याच्या मूल्यांकनासाठी हे सर्वेक्षण महत्वाचे आहे.या सर्वेक्षणात सहभागी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले
राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या एकूण ७३३० शाळांतील २ लाख ३४ हजार ५५ विद्यार्थ्यांची या सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. असे शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांनी ट्विट करून सांगीतले आहे.
0 टिप्पण्या