अखेर हिवरखेड ते आडगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
पावसाबरोबरच जडवाहतुकीमुळे लागली रस्त्याची वाट, नवरात्रोत्सव - गनपती उत्सव काळात येणारी जडवाहतूक वळविण्यात आली होती़ दररोज हजारो जडवाहतूक या मार्गावरून जाते. एवढेच नव्हे तर मागील महिन्याभरापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले़ काही ठिकाणी तर दोन-दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत़ रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे़. तर दिवसा गाडी चालविताना खड्ड्यात गाडी गेल्यावर दुचाकीस्वारांचा गाडीवरील ताबा सुटून छोटे-मोठे अपघात होतानाचे पाहावयास मिळाले आहेत.
हिवरखेड मार्गे अडगाव वरून तेल्हारा जोडणाऱ्या रस्त्याची चाळण झाली होती़ या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते़ याबाबत वाहनधारकांनी व्यक्त केलेली नाराजी व संस्था, संघटनांनी आंदोलनाचा इशारा याबाबत दिला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले़. अखेर हिवरखेड ते आडगाव पर्यन्त च्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. तेल्हारा रहिवासी तसेच तेल्हारा जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0 टिप्पण्या