रविवारी दि.१४ ला राज्यस्तरीय मराठा पाटील उपवर युवक युवती परिचय मेळावा
प्रतीनीधी, अकोला-
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशिय सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.१४नोव्हेंबर२०२१ला अकोला जिल्हा मराठा मंडळ येथे राज्यस्तरीय मराठा पाटील उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात विधायक परंपरा रुजविणारे आणि २५वर्षापासुन सातत्याने परिचय मेळावे घेऊन समाजापुढे आदर्श पाठ मांडला आहे.कुठल्याही प्रकारचे नोंदणी शूल्क घेतले जात नाही.फक्त कृणानुबंध परिचय पुस्तिका शुल्क नाममात्र घेतले जाते. म्हणुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन समाजबांधव या मेळाव्यास आवर्जुन उपस्थित राहतात.
रविवारी सकाळी ठिक११वाजता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाने परिचय मेळाव्यास प्रारंभ होईल.दु.२वाजेपर्यंत उपवर युवक युवती परिचय सत्र होईल.
दु.३ते५वाजेपर्यंत घटस्फोटीत,विधवा,पुनर्विवाहितांचा परिचय मेळावा होईल.या मेळाव्यास अकोला,अमरावती, यवतमाळ,बुलढाणा,वाशिम,वर्धा जिल्ह्यासोबतच खांदेश,मराठवाडाशेजारच्या खंडवा,बर्हाणपुर,इंदौर या मध्यप्रदेश व छत्तीसगढधील समाजबांधव आवर्जुन उपस्थित असतात.
समाजात विधायक-रचनात्मक उपक्रम रुजविण्यासाठी अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशिय सेवा समिती चे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.या मेळाव्यास सर्व समाजबांधवांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.रणजित सपकाळ व सचिव प्रकाश पाटील,पाटील बहुउद्देशिय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार,सचिव श्रीकृष्ण विखे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या