जिल्हाधिकारी,आयुक्त व महापौर यांचा सुंदर शहरासाठी पुढाकार
अकोला:-तत्कालीन मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी सौ निमा अरोरा मॅडम यांची न्यायाची भूमिका व सौ कविता द्विवेदी मॅडम यांचा पुढाकाराने अखेर १० वर्षांपासून रेंगाळत असलेला फूट पाथ विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लागत असून डॉ बाबासाहेब आंबेडकर ओपन एअर थिएटरच्या मोकळ्या जागेमध्ये मनपा प्रशासनाने जागेची आखणी केली असून जवळपास गांधीरोड वरील व मनपा भिंती लगत असलेल्या १८६ फूट पाथ विक्रेत्यांना त्यांचा हक्काच्या जागा मिळणार आहेत,त्यामुळे गांधीरोड मोकळा श्वास घेणार असून रहदारीसाठी रस्ता मोकळा होणार आहे.त्यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे
नुकतीच पथविक्रेता समितीचे( TVC )सदस्य डॉ अशोक ओळंबे व दीपक मेश्राम यांनी जागेची पाहणी केली असता जिल्हाधिकारी सौ निमा अरोरा मॅडम,आयुक्त सौ कविता द्विवेदी मॅडम व महापौर सौ अर्चना मसने मॅडम (महिलाराज) यांनी पथ विक्रेत्यांसाठी योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी मनपा प्रशासनाने या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंग,पाणी,मुतारीची व्यस्था पुरविण्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच चारही झोन मध्ये याच पद्धतीचा आराखडा प्रशासनाने तैयार करून फूट पाथ विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी भावना जागेची पाहणी करतांना डॉ अशोक ओळंबे यांनी व्यक्त केली यावेळी TVC चे दीपक मेश्राम सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गाढे,मधुकर ईचे,दिगंबर शेंडे,मुरलीधर गणेशपुरे, मो युनूस,मो लतीफ,निलेश ईचे,शशी कांबळे,इम्तिहज,कासमानी शहीद इकबाल,गोविंद आठवले,राजेश घोलप,निशाण ईचे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या