उपसभापती निवडणुकीत वंचितची आघाडी
*अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर पं.स. मध्ये वंचितचे उपसभापती
*मूर्तिजापूरमध्ये शिवसेना तर
*बार्शीटाकळी पं. स. मध्ये भाजपचा उपसभापती
सहा पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी ता. १८ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती स्तरावर निवडणूक पार पडली. चार पंचायत समिती उपसभापतीपदी वंचितचे उमेदवार विजयी झाले असून मुर्तीजापुर मध्ये शिवसेनेचा तर बार्शीटाकळी मध्ये भाजपचा उमेदवार उपसभापती पदी निवडून आला. अकोला, तेल्हारा, अकोट, पातुर पं.स.च्या उपसभापती पदी वंचितचे उमेदवार विजयी झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक संस्थामधील स्वराज्य ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी व पातूर या सहा पंचायत समितीच्या उपसभापतींचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सदर रिक्त पदांस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने १८ नोव्हेंबर रोजी संबंधित पंचायत समिती स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पडली. पोट निवडणुकीआधी बहुतांश पंचायत समित्यांमध्ये वंचित आघाडीची सत्ता होती.
दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत सुद्धा वंचित आघाडीला मोठे यश आले. त्यामुळे गुरुवारी झालेल्या सहा पंचायत समित्यांच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे चार उपसभापती झाले. तर मुर्तीजापुर मध्ये शिवसेना तर बार्शीटाकळी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर भाजपचा उमेदवार निवडून आला. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी काम पाहिले.
*वंचितच्या अकोला पॅटर्नला राजेश वावकारच्या उपसभापती पदाने मिळाली पुन्हा उभारी.*
अकोला पंचायत समिती हि अकोला जिल्हा परिषद मधील मिनी जिल्हा परिषद म्हणून ओळखल्या जाते. ह्या पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापती पदावर बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांला जि. प. अध्यक्ष व जि. प. उपाध्यक्ष प्रमाणेच समजल्या जाते. अश्या महत्वाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या माळी समाजाला पुन्हा एकदा सत्तेत बसवत पदाधिकारी करण्याचे धाडस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजेश वावकार या माळी समाजाच्या युवा कार्यकर्त्याच्या उपसभापती पदाच्या निमीत्ताने वंचितने केले. अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेल्या अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या शोशल इंजिनिअरिंगला पुन्हा एकदा राजेश वावकार यांच्या नावाने उभारी मिळाली असे जिल्हाभरात राजकिय तज्ञ आपले मत व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सभापती निवडणुकीच्या दरम्यान माळी समाजाच्या उमेदवाराचा चुकलेला उमेदवारी अर्ज या संदर्भात वंचितमधे मोठ्या प्रमाणात किलबील झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजेश वावकार या तरूण कार्यकर्त्यावर दिलेली जबाबदारी हि महाराष्ट्रभर माळी समाजाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी करणारी आहे असा विश्वास राजकीय जानकार व्यक्त करत आहेत. खरे पाहता असा विश्वास जनमानसावर बिंबविल्या गेल्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आता पुर्णपणे माळी समाज उभा राहिल असे या प्रयोगाने वाटत आहे. श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून वंचित असलेल्या माळी समाजाला नेहमी भरभरून दिले. माळी समाजाच्या सामान्य कार्यकर्त्याला जि. प. अध्यक्ष केले एकदा नव्हे तर दोनदा आमदार केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले या सोबतच लोकसभा सारख्या देशातील सर्वोच्च निवडणुकीत माळी समाजाला उमेदवारही दिली. एवढे प्रचंड धाडस वंचितच्या वतीने केल्या गेले असतांना माळी समाज हे विसरला नाही. त्यात आता अकोला पंचायत समिती सभापती पद हे ओबीसीसाठी राखीव असतांना उपसभापतीपदी बोध्द असलेल्या प्रमुख दावेदाराला बाजूला ठेवून उपसभापती पद हे माळी समाजाला देण्यात आले. हाच वंचित बहुजन आघाडीच्या शोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आता नव्या उभारीला सत्त्यात आणणारा आहे. एकिकडे वंचित वगळता सर्व राजकीय पक्ष माळी समाजाच्या या युवा कार्यकर्त्यांला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले असतांना वंचित बहुजन आघाडीने खेचुन आणलेला हा विजय राज्यातील व केंद्रातील प्रस्थापित राजकीय पदाधिकाऱ्यांच्या गालफाटात चपराक लावल्या सारखाच आहे. जि. प. सभापती निवडणूकीत भाजपा हि अपक्षांच्या बाजूला उभी राहिली असा खोटा प्रचार करण्यात आला होता तो या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला थेट मतदान केल्याने उघड झाले. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार सोबतच भाजपा या सर्व प्रस्थापित पक्षाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने वंचीत असेलेल्याला माळी समाजाच्या राजेश वावकार या युवा कार्यकर्त्यांला जिल्हाभरात सर्वाधिक मतांनी विजयी केले. हे इथे उल्लेखनीय आहे. त्यामुळे मी एक माळी समाजाचा कार्यकर्ता म्हणून श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचे समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नंदकिशोर निलखन
मु. पो. देवळी
ता. जि. अकोला
0 टिप्पण्या