म्हैसाग परिसरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये केला प्रवेश
अकोला
राजकारणाचा समाजकारण व जनतेच्या समस्या निराकरणासाठी व उत्तरदायित्व म्हणून कार्य केल्यास समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा विकास व समाजाच्या कल्याणासाठी पाठिंबा मिळतो यामुळे महैसाग परिसरातील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रवेश केला त्यांच्या कार्याचा सन्मान व त्यांच्या समतेचा वापर जिल्हा भाजपाच्या विस्तारासाठी आपण निश्चित करू असा विश्वास जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
कोणतीही निवडणूक नसताना आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या कामाचा विकासाचा व सर्वांसाठी सदैव तत्पर राहण्याच्या वृत्तीमुळे पंचक्रोशीतील अकोला पूर्व तिला अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी आज कचरूजी महाराज यांच्या साक्षीने महैसाग इथे प्रवेश केला त्यांचा स्वागत करताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अकोला भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास उमाळे हे होते. मंचावर राजेश बेले डॉक्टर शंकरराव वाकोडे, दिगंबर गावडे माधव मानकर, अनिल गावंडे, विवेक भरणे देवेंद्र देवरे प्रवीण हगवणे पाटील मनीराम टाले आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते. यावेळी मनोज देशमुख, मिलिंद देशमुख मिथुन गवई गुड्डू गावंडे वसंत कर्ण कार, मुन्ना नवल कार अंकुश नवल कार रामकृष्ण सोरटे भानुदास पवार शुभम लो होटे अमोल जयस्वाल आधीच आधीच्या दहशतवाद या भागातील असंख्य नागरिकांनी जागृत देवस्थान कचरू महाराज संस्थानाच्या साक्षीने भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. सावरकर यांनी भाजपाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास उबाळे तर संचालन राजेश बेले तर आभार प्रदर्शन दिगंबर गावंडे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत मनोज देशमुख अनिल गावंडे यांनी केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 टिप्पण्या