आनंद इलेक्ट्रॉनिक्स चे संचालक कमलेश पोपट यांच्यावर दुकानातच हत्या व दरोडा
अकोला
चिखली शहराचे प्रतिष्ठित नागरिक व धार्मिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आनंद इलेक्ट्रॉनिक्स चे संचालक कमलेश पोपट यांच्यावर हल्लेखोरांनी दुकानात हल्ला करून त्यांची हत्या केली दरोडा टाकला त्यामुळे त्यांची जागीच मृत्यू झाली रहदारीच्या चिखलीच्या मेन रोडवर रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेचा श्री रामनवमी शोभायात्रा समिती व अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी निषेध व्यक्त करून हल्लेखोरांचा त्वरित तपास करून दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करून कडक कारवाई कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
धार्मिक क्षेत्रांमध्ये सातत्याने रामभक्त कमलेश शेठ पोपट चिखली शहरामध्ये कार्यरत होते त्यांच्यावर रात्री हल्लेखोरांनी दुकानात हत्या करून लुटमार केली या घटनेचा पोलीस प्रशासनाने दखल घेऊन हल्लेखोरांना अटक करावी दरोडेखोरांवर कडक कारवाई करावी.व कमलेश पोपट यांना श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे
0 टिप्पण्या