वंचित बहुजन आघाडी एस.टी. कामगारांच्या पाठीशी राहणार उभी
दिनांक 16/ 11/ 2021 रोजी रात्री नऊ वाजता मोबाईल वरून वंचित बहुजन आघाडी च्या पाठिंब्याची मागणी एस.टी. कामगारांनी केली दिनांक 17/ 11/ 2021 रोजी काही कर्मचारी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या दडपना खाली येऊन एस.टी. सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या निरोपानुसार शहर अध्यक्ष मा.शंकरराव इंगळे व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मनोहर बनसोड, गणेश पळसुकर, पुरुषोत्तम अहिर, विजय तायडे ,सुरेश कलोरे सिद्धार्थ पळसपगार, असे अनेक कार्यकर्ते सकाळी 6.00 वाजता एस.टी. डेपो मध्ये हजर राहून एस.टी. चालू करण्याचा स्वार्थी कर्मचाऱ्याचा डाव हाणून पाडला.
आणि वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत एस.टी. चे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत माननीय, अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पाठिंब्याचे संपुर्ण पणे पालन करून कार्यक्रम राबऊ वंचित बहुजन आघाडी एस.टी. कामगारांच्या पाठीशी उभी राहणार आहे. तसेच एस.टी. कामगाराने आपले घर समजून जेवणात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नये प्रयत्न केल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला. मा.अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एस.टी.चे शासनात विलीनीकरण करण्यासाठी यापूर्वीच एस.टी. कामगारांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.
प्रसिद्धी प्रमुख
पुरुषोत्तम वानखडे
0 टिप्पण्या