अकोला डेली मेल न्यूज नेटवर्क
दिनांक 21 ऑक्टोंबर 2021
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहराचे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष मोहम्मद सलीम मोहम्मद युनुस यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन आज गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद अकोला येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सात देऊन वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अकोला येथे गुरुवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.मोहम्मद सलीम यांनी शेकडो सहकार्याच्या समवेत हा प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ तेल्हारा शहरात नक्कीच थांबणार आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठी खिडार पडल्याचे दिसून येते तसेच पुढील वर्षी होऊ घातलेल्या तेल्हारा नगर परिषद आणि अकोट विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजातील मतदार वाढून वंचित बहुजन आघाडी ची ताकद वाढून वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चितच होणार अशा प्रकारचा आशावाद जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी मोहम्मद सलीम यांचे स्वागत करून पक्ष प्रवेश देता वेळीं व्यक्त केला.
0 टिप्पण्या