Ticker

6/recent/ticker-posts

सुप्रसिद्ध गांधीवादी डाॅ.एस.एन. सुब्बाराव यांना अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व विविध संघटनांचेवतीने श्रद्धांजली

 सुप्रसिद्ध गांधीवादी डाॅ.एस.एन. सुब्बाराव यांना अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व विविध संघटनांचेवतीने श्रद्धांजली
——————————————


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध गांधीवादी डाॅ.एस.एन. सुब्बाराव यांच्या दु:खद निधनाची वार्ता कळताच अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सामुहिक प्रार्थना घेण्यात आली.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डाॅ.गोवर्धनदादा खवले, राष्ट्रधर्म युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रामेश्वरदादा बरगट,व्यसनमुक्ती चळवळीचे रामराव पाटेखेडे,सर्वोदयमित्र प्रा.डाॅ.मोहन खडसे,भूदान मंडळाचे माजी सदस्य वसंतराव केदार ,


महाराष्ट् अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.संजय तिडके,अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आकाश इंगळे,काटीपाटी बॅरेज संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोरभाई मिश्रा ,राष्ट्रसेवा दलाचे कृषीकेश निमकंडे ,वं.तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे सचिव डाॅ.काशीनाथ दाते यांनी श्रद्धांजली वाहिली.सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी समारोप केला.सभेचे संचालन डाॅ.गोवर्धनदादा खवले यांनी केले.याप्रसंगी भाईजींची नौजवान आओरे,एक जगत की धरती माता,जय जगत पुकारे ही गीते सर्वांनी सुस्वरात गायली.सामुहिक प्रार्थना व राष्ट्रवंदनेने सभेची सांगता झाली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या