*आगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक ऐक्य जोपासत कार्यक्रम संपन्न...*
प्रतिनिधी: विशाल शिरसाट
दिनांक: १८ ऑक्टोंबर २०२१
आगर येथील तीर्थक्षेत्र विश्व शांती बुध्द विहार येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्सवात साजरा करण्यात आला.अकोला तालुक्यातील आगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते विहार परीसरात विद्युत रोषणाई करण्यात येवुन सकाळी धम्म ध्वज फडकवुन भगवान बुद्ध भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून हारापॅन करण्यात आले होते सायंकाळी धम्म उपासक व उपासिका यांच्यासह श्रामणेर बोधाचायॅ यांनी सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन तिथॅक्षेत्र विश्व शांती बुध्द विहार समीती धम्म उपासक उपासिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते
तर आज् मंगळवार रोजी येथील गुरूदेव सेवा मंडळाने बुध्द भिम गीत सादर करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले यावेळेस सर्वाचाच सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळाने अथक परिश्रम घेतले होते संचालन शेषराव शिरसाट यांनी केले होते सरणतय घेऊन समारोप करण्यात आला.
0 टिप्पण्या