दिवाळीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फटाकामुक्ती अभियान-गजेंद्र सुरकार
——————————————
अकोला दि ३१ ऑक्टोबर,
दिवाळीत फटाका संस्कृती म्हणजे पैशाची नासाडी असुन त्यामध्ये विनाशाची बीजे पेरलेली असतात म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने दिवाळीनिमित्त राज्यभर फटाकामुक्ती अभियान राबवित असल्याची माहिती राज्य प्रधानसचिव गजेंद्र सुरकार यांनी दिली.अकोला शाखा संपर्क मोहिमेनिमित्ताने आयोजित बैठकित ते बोलत होते रणपिसे नगरातील निसर्गोपचार केन्द्रात आयोजित या सभेत संस्थेचे सचिव डाॅ.काशीनाथ दाते अध्यक्षस्थानी होते. तर राज्य सरचिटणीस प्रा.बबनराव कानकिरड ,वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.माधुरी झाडे,मेळघाट विभाग कार्याध्यक्ष डाॅ.हरिष पेटकर व जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. फटाक्याऐवजी पुस्तकाशी मैत्री करुन दिवाळी उत्सव साजरा करण्याचे आवाहन डाॅ.काशीनाथ दाते यांनी अध्यक्षिय भाषणातुन केले.
कार्यक्रमास जिल्हा युवा संघटक सचिन थुटे,प्रसिद्धीप्रमुख गजानन ढाले,युवती संघटिका दिव्या चव्हाण, प्रा. डाॅ.निलीमा राजेश खंडारे यांचेसह जिल्ह्यातील कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.हम होगे कामयाब या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या