परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नं.१७ भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन सुविधा
सन २०२२ मध्ये @msbshse मार्फत होणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नं.१७ भरून) प्रविष्ट होण्यासाठी २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून संबंधित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तपशील खाली पहा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
* प्रकटन *
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्यानुसार सन २०२२ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. १७) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.
१. इ. १० वी व इ. १२वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राहय धरण्यात यावा. कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इ.१०वी इ.१२वी सन २०२१ चा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने खाजगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीबाबत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा / कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख ३१/०८/२०२१ अशी ग्राहय धरण्यात यावी. सदर बदल कोविड– १९ मुळे फक्त सन २०२२ च्या परीक्षेपुरताच लागू राहील. तथापि विद्यार्थ्यांच्या वयासाठी दि. ३१ जुलै अशी तारीख राहील.
हिंदी-
वर्ष 2022 में @msbshse आदि के माध्यम से 10 वीं और इतने पर। 22 नवंबर से 6 दिसंबर 2021 तक छात्रों को 12वीं की परीक्षा में निजी रूप से (फॉर्म नंबर 17 भरकर) प्रवेश करने की ऑनलाइन सुविधा उपलब्ध कराई गई है और संबंधित छात्र इस अवसर का लाभ उठाएं। नीचे दिए गए विवरण देखो।
0 टिप्पण्या