*💫महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची सभा मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न.💫*
---------------------------------------------
*💫मा.श्रीमती वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, श्री विजय नवल पाटील, माजी केंद्रीय मंत्री,फौजिया खान, खासदार, राज्यसभा, श्री विजय गव्हाणे ,आमदार तसेच अनेक शिक्षण संस्था महामंडळ पदाधिकार्यांची उपस्थिती.💫*
---------------------------------------------
*💫ॲड.श्री किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांनी घडवून आणली सभा व शालेय व्यवस्थापन तथा शाळेशी संबंधित अनेक समस्यांवर केली चर्चा.💫*
---------------------------------------------
दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्राची वाताहत होत आहे. शिक्षण व्यवस्थापन तथा शिक्षक यांच्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळांचे वेतनेतर अनुदान असो, अमर्याद व बृहत् आराखडा याशिवाय स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मान्यता असो, अशा अनेक कारणांनी शाळा व शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.शासनाने सन 2001 पासून विनाअनुदान धोरण सुरू केले. मात्र आजही अनेक शिक्षक म्हातारे होऊन, निवृत्त होत असून सुद्धा त्यांना वेतन मिळत नाही.शासन मागेल त्याला स्वयंअर्थसहाय्यित शाळा व कनिष्ठ महाविद्यालये वाटत आहे.यामुळे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी पडत आहे.परिणामी अनुदानित शाळेवरील शिक्षक अतिरिक्त ठरत असून त्यांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर कला व वाणिज्य सारख्या तुकड्या विद्यार्थ्यां अभावी बंद पडत आहेत.
या संदर्भातच आज दिनांक 18/ 10/2021 रोजी श्री यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री श्री विजय नवल पाटील, फौजिया खान,खासदार, विजय गव्हाणे,आमदार तथा अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशासाठी मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब एक अनुभव संपन्न व जाणकार नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ह्या समस्या सुटण्याची फार मोठी आशा आहे.आपल्या अमरावती विभागाचे शिक्षक आमदार माननीय ॲड.श्री किरणरावजी सरनाईक हे शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, या प्रयत्नातूनच त्यांनी आज ही सभा घडवून आणली. या सभेमध्ये शालेय व्यवस्थापनाशी निगडित तथा शिक्षकांशी निगडित अनेक समस्या मांडण्यात आल्या.मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व समस्या ऐकून चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला व या समस्या सोडविण्यासाठी आश्वस्त केले आहे. निश्चितच भविष्यामध्ये ह्या समस्या सोडविण्यात येतील.
---------------------------------------------
0 टिप्पण्या