Ticker

6/recent/ticker-posts

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या उपोषण करर्त्यांना असेल मिळाला न्याय

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या उपोषण करर्त्यांना असेल मिळाला न्याय


अकोला , आज सोमवार ३० ऑगस्ट रोजी उपोषण करर्त्यांना न्याय मिळाला. गत पाच दिवसापासन सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण, आज ज्युस पेऊन सोडविण्यात आले. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना आणि महावितरण प्रशासन यांच्यासोबत झालेली सकारात्मक चर्चा मध्ये विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना चे पटोकार आणि उंबरकर यांच्यावर बदलीबाबत झालेला अन्याय दूर करून संघटनेने  दिलेल्या पर्यायी  ठिकाणी बदली करून त्यांना न्याय देणार असे लेखी  आश्वासन अधीक्षक अभियंता श्री पवन कुमार कचोट साहेब आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री विशाल पिपरे साहेब यांनी संघटनेला दिली. म्हणून संघटनांनी आपले बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेतले स्वतः श्री पवन कछोट साहेब आणि विशाल पिपरे साहेब संघटनाच्या पेंडॉल मध्ये येऊन उपोषण फळाचे ज्युस देऊन उपोषण सोडविले.


बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ते उपोषण सांगता होईपर्यंत अकोला जिल्हा मधील संघटना पदाधिकारी, सभासदांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला एकजुटीने आंदोलन यशस्वी झाले. दरम्यान काळात केंद्रीय अध्यक्ष श्री रवि बारई, सरचिटणीस श्री रवि देवकांत, प्रादेशिक पदाधिकारी श्री प्रभाकर लहाने,झोन पदाधिकारी श्री तोमर , श्री गंगावणे यांनी उपोषण संबंधी लक्ष केंद्रित करून संघटनेचे वतीने आपले पातळीवर संपर्क करुन व्यवस्थापनाला जागृत करून संघटनेची बाजू स्पष्ट केली. असे संघटनेचे सचिव मदन त्रिपाठी यांनी कळविले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या