Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास परवानगी द्या खासगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांची मागणी

प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास परवानगी द्या
खासगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांची मागणी


अकोला, दि. 30 प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने प्रत्यक्ष वर्ग भरण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र राजकिय पक्षाचे सर्व कार्यक्रम सुरळीत होत असून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यावर निर्बंध का असा प्रश्न खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांनी राज्यसरकारला केला.
गत दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा येत आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल सुद्धा उपलब्ध नाही ग्रामीण भागामध्ये मोबाईल कव्हरेज सुद्धा नसते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांची मानसिकता टाक्स फोर्स यांनी समजून घ्यावी योग्य तो निर्णय घ्यावा. असे सर्व शिक्षकांची मागणी होत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शाळा हळूहळू सुरू होणार होते परंतु टाक्स फोर्स ने सप्टेंबर अखेर पर्यंत शाळा सुरु करू नये असा सला दिला. त्यामुळे सध्या तरी राज्यामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू राहील असं वाटतं. खरे पाहता ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव विद्यार्थ्यां  वर्गावर पडत नाही.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता काही राजकीय पक्ष एकमेकांच्या जीवावर उदार झाले आहे सर्व कोरुना नियमाची पायमल्ली करून आंदोलन आणि उपोषण करत आहेत असे असेल तर हा सरळ विद्यार्थ्यांवर अन्याय आहे याची शासनाने दखल घ्यावी व लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात असे महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

#akoladailymail
#akolanews
#citynews
#24news

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या