Ticker

6/recent/ticker-posts

वेस्टर्न इंडिया कौन्सिल मुंबई कार्यकारिणीची महानगरात भेट*

*वेस्टर्न इंडिया कौन्सिल मुंबई कार्यकारिणीची महानगरात भेट*



अकोला - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल मुंबईच्या कार्यकारणी मंडळातील सदस्यांनी मंगळवारी अकोला शाखेला भेट दिली. यात कौन्सिलचे चेअरमन सीए मनीष गादीया, व्हॉईस चेअरपर्सन सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, कोषाध्यक्ष सीए जयेश काला, विकासा चेअरमन यशवंत कासार, औरंगाबाद येथील सीए उमेश शर्मा, नागपुर येथील सीए अभिजित केळकर तसेच सेंट्रल कौन्सिल सदस्य सीए दुर्गेश काबरा आदी पदाधिकारी उपस्थित होते. तोष्णीवाल ले आऊट परिसरातील सीए भवन येथे संपन्न झालेल्या या भेट कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आला. यावेळी अतिथींचे स्वागत करण्यात येऊन त्यांच्या द्वारे ई न्यूज लेटरचे विमोचन करण्यात आले. यावेळी अकोला शाखा अध्यक्ष सीए केयूर देढीया यांनी शाखेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली व कोरोना काळात अनेक शाखांच्या सहकार्याने सनदी लेखापाल व विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वेबिनोर आयोजित केले असल्याचे सांगितले. कौन्सिल अध्यक्ष सीए मनीष गादिया यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अकोला शाखेचे कौतुक करीत कार्यकारणी मंडळास धन्यवाद देत सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जेष्ठ सनदी लेखापाल यांना स्मृतिचिन्हे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मंच संचालन सीए अनुश्री अग्रवाल यांनी व आभार सीए जलज बाहेती यांनी मानलेत. यावेळी अकोला व खामगाव येथील सनदी लेखापाल व विद्यार्थी उपस्थित होते.
सफलतेसाठी शाखा अध्यक्ष सीए केयुर देढीया,
उपाध्यक्ष सीए हिरेन जोगी, सचिव सीए जलज बाहेती, कोषाध्यक्ष व विकासा चेअरमन सीए दीपक अग्रवाल, कार्यकारणी सदस्य गौरीशंकर मंत्री तसेच विकासा समितिच्या  सदस्य आदीनी परिश्रम घेतले असल्याची माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी दिली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

#akoladailymail
#akolanews
#citynews
#24news

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या