Ticker

6/recent/ticker-posts

विश्व जागृती मिशनचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

विश्व जागृती मिशनचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न


अकोला--लाखो भक्तांचे तारणहार पु.गुरुदेव आचार्य सुधांशुजी महाराज प्रणित विश्व जागृती मिशन च्या वतीने महानगरात गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
स्थानीय गोरक्षण रोड परीसरारील आनंद निकेतन सत्संग भवन आयोजित या उत्सवात आ. गोवर्धन  शर्मा,आचार्य शिवदत्तजी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कोरोना नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम समन्वयक आचार्य शिवदत्तजी महाराज, पुरुषोत्तम वनखडे प्रधान,विश्वजित सिसोदिया महामंत्री  डॉ अंबादास चुकेवार,डॉ वासुदेव शेकार, मनोहरराव खरपकार,अनिल अलिमचंदानी आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला.
यावेळी सद्गुरुदेव पादुका पूजन व अभिषेक पुरुषोत्तम वानखड़े व दिगंबर सपकाळ यांनी सपत्नीक केले. यावेळी अकोला शाखेच्या वतीने संरक्षक आ. गोवर्धन  शर्मा,पुरुषोत्तम वानखड़े, महामंत्री विश्वजीत सिसोदिया यांनी आचार्य शिवदत्तजी महाराज यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच आ.गोवर्धन शर्मा यांचे डॉ वासुदेव शेकार यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.उत्सवात सुमधुर भजन प्रस्तुती टीकाराम येसनसूरे,दिगम्बर सपकाळ संजय भारसकले, प्रभु इंगळे यांनी सादर केली.आचार्य शिवदत्तजी महाराज यांनी प्रवचन करून गुरूचे महत्व सांगितले.गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण असून  शिष्य हा सण मनापासून व श्रद्धा पूर्वक साजरा करतात. भारतीय संस्कृती मध्ये आई वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले असून अश्या गुरूला शरण जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी आ. गोवर्धन शर्मा यांनी आपले विचार व्यक्त करीत उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.सद्गुरुदेव यांची आरती व गुरुभक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले.दरम्यान सकाळी आश्रमात होमहवन करण्यात येऊन सायंकाळी  स्त्री रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना  भोजन व प्रसाद वितरित करण्यात आला. हे अन्नदान अनंतराव उगले यांचे वडिलांच्या वाढदिवसा निमित्त करण्यात आले. प्रास्तविक व आश्रम राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रधान पुरुषोत्तम वानखडे यांनी,संचालन टीकाराम येसनसूरे व आभार प्रदर्शन विश्वजीत सिसोदिया यांनी केले.कार्यक्रमाच्या सफलतेसाठी विश्वजित सिसोदिया , रामदास बोरोडे, जगदीश जोशी,रामेश्वर सुरते,कैलाश मुळेकर रवि नाथानी, तेजस मुळेकर यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी डॉ वासुदेव शेकार,मनोहरराव खरपकार डॉ अंबादास चुकेवर सुधाकर फुलारी, दत्तात्रय भेराणे,रमेश पवार, रामलाल अग्रवाल,अनिल अलिमचंदानी, विलासराव अनासने, रामदास गावत्रे, वीरेंद्रकुमार श्रीवास्तव, दिनकर खेड़कर,सौ लता सिसोदिया,सौ आशाताई खरपकार, सौ संध्या वानखड़े ,श्रीमती सुमनताई माल्टे, सौ मंजुअग्रवाल ,सौ सरिता सपकाळ ,सौ अलिमचंदानी, सौ बोरोडेताई,सौ मुकुंदे,सौ मुळेकर, श्रीमति अंजली धानोरकर,सुमित्रा शेगोकार ,पियुष्मा राठोड आदी गुरुबंधु भगिनी उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या