Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय नागलकर हत्या प्रकरणाला गती, मुख्य आरोपीकडून गुन्ह्यातील देशी कट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त

अक्षय नागलकर हत्या प्रकरणाला गती, मुख्य आरोपीकडून गुन्ह्यातील देशी कट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त

अकोला 
पोलीस स्टेशन डाबकी रोड, अकोला येथे अक्षय नागलकर याचे खुन प्रकरणामध्ये गु रं नं 337/25 कलम 103(1), 140(1), 238, 61(2), 3(5) सहकलम 3, 4, 25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील अद्याप निष्पन्न झालेले सर्व नऊ आरोपी पोलीस कोठडी मध्ये अटक आहेत. आज दिनांक 04/11/2025 रोजी गुन्हयाच्या कटातील मुख्य आरोपी चंद्रकांत महादेव बोरकर याचेकडून अक्षय नागलकर याचे हत्येमध्ये आरोपीतांनी वापरलेले देशी बनावटीचे अग्निशस्त्र दोन जिवंत काडतूसांसह जप्त करण्यात आले असून गुन्हयात अद्याप देशी बनावटीचे एकून तिन अग्निशस्त्रे (कट्टे) आणि 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.


सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करित असून तपासमध्ये प्रभारी अधिकारी पो. स्टे. डाबकी रोड, स.पो.नि. अभिषेक अंधारे, पोउपनि अनिल चव्हान, पोलीस अंमलदार दिपक तायडे, प्रविन इंगळे, मंगेश इंगळे, मुन्ना ठाकूर यांनी सहकार्य केले



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या