Ticker

6/recent/ticker-posts

अकोला कोचिंग क्लासची रायगड ट्रीप दरम्यान दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू

अकोला कोचिंग क्लासची रायगड ट्रीप दरम्यान दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू

अकोला 
रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे अकोला जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी व 3 शिक्षक असे फिरण्याकरिता काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी व 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले. त्यापैकी 1 विद्यार्थी व 1 शिक्षक मयत झाले आहेत. 1 विद्यार्थी सुखरूप आहे.


 नावे  खालीलप्रमाणे
1) राम कुटे वय 60 वर्षे, रा अकोला, शिक्षक. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली PHC येथे पाठवण्यात आला आहे.

2) आयुष रामटेके वय 19 रा. अकोला, विद्यार्थी. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड PHC येथे पाठवण्यात आला आहे.

 3) आयुष बोबडे वय 17 वर्ष रा. अकोला हा विद्यार्थी सुखरूप आहे. अशी माहीती जिल्हा माहीती कार्यालयातुन प्राप्त झाली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या