चांन्नी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर दबंग कारवाई
पातूर ( प्रतिनिधी- गुलाब भाऊ अंभोरे) तालुका पातुर पोलीस स्टेशन चांन्नी अंतर्गत येत असलेले ग्राम सस्ती शिवार आणि ग्राम नवेगाव शिवार या दोन ठिकाणी दिनांक- १०/११/२५. रोजी गुप्त माहितीनुसार अवैध धंदा गावठी हातभट्टी हड्ड्यावर चांन्नी पोलिसांनी ॲक्शन मूड वर येऊन छापे मारून अवैधरित्या चालवीत असलेल्या कडून सळवा मोहमाच आणि गावठी हातभट्टी ची छापा मारून असा एकूण ८८५००/रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी १) पवन शामराव सरकटे वय २४ वर्ष. राहणार नवेगाव. २) अशोक महादेव ससाने वय ३४ वर्ष राहणार नवेगाव. ३) जगदेव महादेव ससाने वय ५२ वर्ष. राहणार नवेगाव. ४) विजय महादेव पांडे वय ३८ वर्ष राहणार नवेगाव. ५) धनराज सुखदेव अंभोरे वय २८ वर्ष. राहणार सस्ती. या आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, गुन्हा नोंद केला आहे. अवैध दारू हातभट्टी गावठी दारू काढताना रंगे हात पकडून, माननीय पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांचे ऑपरेशन प्रहार अंतर्गत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमी वर कायदा व सुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी श्री. अर्जित चांडक पोलीस अधीक्षक अकोला जिल्हा. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, आणि बाळापुर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन चांन्नी चे श्री. रवींद्र लांडे, आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय घुगे, आणि चान्नी पोलीस यंत्रणा- सुधाकर करवते, ज्ञानेश्वर गीते, रुपेश मोरे, शिवानंद स्वामी, राजनंदिनी पुंडके, इत्यादी पोलीस यंत्रणेने छापा मारून आरोपीवर गुन्हे.


0 टिप्पण्या