Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत वाघजाळी वरखेड येथे स्वच्छता अभियान

ग्रामपंचायत वाघजाळी वरखेड येथे स्वच्छता अभियान



बार्शीटाकळी
                         
येथून जवळच असलेल्या वाघजाळी (वरखेड ) येथे, मुख्यमंत्री पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत, प्रामुख्याने गावच्या तरुणांनी पुढाकार घेत आज संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून एक नवा संदेश दिला.  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायतराज अंतर्गत ज्या ग्रामपंचायत ने सहभागी झाली, त्यांनी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, आणि गावातील नागरिक यांच्या समन्वयाने गावातील प्रत्येक प्रश्न निकाली काढून, नागरिकांसाठी योग्य ती सोयसुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले गाव तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर नेऊन प्रथम पारितोषिक कसे पटकवता येईल, त्याच दृष्टिकोनातून गावातील काही युवकांनी विशेषतः ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष अतुल चिंचोलकर आणि त्यांच्या मित्रमंडळाने पुढाकार घेऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनवण्याचा निर्धार घेत, सर्वप्रथम संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या अभियाणाची सुरुवात करण्यात आली. 
     

     
सविस्तर बातमी येथे ☝️पहावी....
  
यावेळी मुंबई पोलीस कुंदन धुरंधर, म. सु. ब. चे सिद्धांत पवार, स. क. कर्मचारी वैभव सिरसाट, माजी उपसरपंच गौतम सिरसाट, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नरेश सिरसाट, संदेश इंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी शिलवंत खंडारे आणि अनेक गावकरी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या