Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आवास घरकुल योजनेत लाभासाठी भ्रष्टाचार

पंतप्रधान आवास घरकुल योजनेत लाभासाठी भ्रष्टाचार


पातूर ( प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे.). सावरगाव मध्ये रोजगार सेवक अनिरुद्ध मुळे यांचा भ्रष्टाचार. पातुर पंचायत समिती अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत. तालुका पातुर जिल्हा अकोला येथील रोजगार सेवक अनिरुद्ध उत्तम मुळे यांच्यावर नागरिकांनी गंभीर आरोप केलेले आहेत. तसेच दिनांक 27/ १०/२५ रोजी सावरगाव येथील नागरिक यांनी पंचायत समिती पातुर गट विकास अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केलेले आहेत. सावरगाव येथील तक्रारदार मंदा रामराव बलक यांना २०२३- २०२४ मध्ये पंतप्रधान आवास घरकुल मिळाले असता एक लाख वीस हजार चा चेक मिळाला परंतु रोजगार हमीचे 26 हजार रुपये चे मस्टर अजून पर्यंत रोजगार सेवक अनिरुद्ध मुळे सावरगाव यांनी टाकलेला नाही बरेच नागरिकांचे रोजगार हमीचे मस्टर टाकलेले नाहीत रोजगार सेवक हा नागरिकांना उडवा उडवीचे उत्तरे देतो. अशा नागरिकांनी तक्रारी केलेले आहेत. किंवा घरकुल लाभार्थ्यांचा जॉब कार्ड नंबर स्वतः चुकून तो नंबर चुकीचा आहे याचा सांगतो परंतु जॉब कार्ड नंबर हा रोजगार सेवकांनी दिलेला आहे असे नागरिकांनी तक्रारीत नमूद केलेले आहे. अशा अनेक तक्रारी गट विकास अधिकारी पंचायत समिती पातुर जिल्हाधिकारी अकोला नरेगा गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला, तसेच लोकशाही दिनी अनेक तक्रारी नागरिकांनी दिलेल्या आहेत. तसेच घरकुलचे चेक टाकण्यासाठी पैशाची मागणी करतो असे आरोप नागरिकांनी रोजगार सेवकावर केलेले आहेत. तसेच सावरगाव येथील वृक्षारोपण मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा रोजगार सेवकांनी केलेला आहे असे आरोप सर्व येथील नागरिकांनी केलेले आहेत. परंतु याकडे कोणताच वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही. मग हे कोणाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार चालतो. ही फार मोठी गंभीर बाब आहे . सावरगाव येथील रोजगार सेवक याच्यावर चौकशी करून कठोर करावे करावी आणि निलंबित करावे असे गावकऱ्यांचे तक्रार आहे. नाहीतर पंचायत समिती समोर आमरण उपोषण देण्याचा इशारा तक्रार करता मंदा रामराव बलक सावरगाव यांनी केलेला आहे.

                     तक्रार ☝️


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या