Ticker

6/recent/ticker-posts

गोवा येथे पार पडलेल्या ‘जीनियस अबॅकस’ राज्यस्तरीय स्पर्धेत अकोल्याच्या नेहा खोडकेचा तिसरा क्रमांक!

गोवा येथे पार पडलेल्या ‘जीनियस अबॅकस’ राज्यस्तरीय स्पर्धेत अकोल्याच्या नेहा खोडकेचा तिसरा क्रमांक!


अकोला प्रतिनिधी :
पुर्णाजी खोडके

अकोला जिल्ह्यातील बारुला विभागातील मारोडी या छोट्या खेड्यातून आलेली १२ वर्षांची प्रतिभावान विद्यार्थिनी नेहा युवराज खोडके हिने आपली बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या जोरावर संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला आहे. गोवा, मडगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या “जीनियस अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन (राज्यस्तर)” या प्रतिष्ठित परीक्षेत नेहाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.. 

नेहाला, 26 ऑक्टोबर रोजी मडगाव (गोवा) येथे आयोजित, समारंभात तीन ‘रॉंग टोपी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या विजयानंतर अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नेहाचे कौतुक होत आहे... ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या या मुलीने मेहनत, चिकाटी आणि सातत्य यांची सांगड घालून यश संपादन केले आहे. नेहाचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून “इच्छा, मेहनत आणि आत्मविश्वास” या त्रिसूत्रीने यशाचे शिखर गाठता येते याचे उदाहरण ठरले आहे. नेहाचे वडील युवराज देविदास खोडके हे शेतकरी असून आई शुभांगी युवराज खोडके यांनी मुलीला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले. नेहाने आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना व शिक्षकांना देताना सांगितले,

प्रतिक्रिया..

माझ्या आई-वडिलांच्या प्रेरणेने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी ही उंची गाठू शकले. ग्रामीण भागात राहूनही मोठं स्वप्न पाहायला आणि ते पूर्ण करायला काहीच अडचण नाही.
- नेहा युवराज खोडके 


       सविस्तर वृत्त येथे ☝️ पाहावे 

या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अवघ्या काही सेकंदांत गुंतागुंतीच्या गणिती उदाहरणांचे अचूक उत्तर देत नेहाने परीक्षकांची दाद मिळवली.शाळा प्रशासन, शिक्षक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी जिल्ह्याभरातुन नेहाचे अभिनंदन केल्या जात असून तिच्या पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातुन तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या