मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४८ व्या अधिवेशनाचा बहुमान श्री शिवाजी महाविद्यालय अकोल्यात
श्री शिवाजी महाविद्यालयात होणार मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४८ राष्ट्रीय अधिवेशन
----------------------------------------
उद्घाटक मा ना. चंद्रकांतदादा पाटील तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री श्री. हर्षवर्धन देशमुख यांची उपस्थिती
-----------------------------------------------------
स्थानिक/अकोला. दि.२५ ऑक्टोबर २०२५
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला व मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ४ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४८ राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये या अधि परिषदेचे दहावे अधिवेशन २५,२६ व २७ ऑक्टोंबर १९८६ रोजी तर ७,८ व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी ३८ वे अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. २०२५ ह्यावर्षी ४८ व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मान पुनः एकदा अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयाला देण्यात आला आहे. सदर मंडळाने मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४८ व्या वार्षिक अधिवेशनाचे उदघाटक ४८ वी राष्ट्रीय मराठी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री श्री. हर्षवर्धन देशमुख उद्घाटक पाहुणे चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ विलास खंदारे राहणार आहे.
परिषदेच्या तीन दिवसीय अधिवेशना दरम्यान पुढील विषयावर मंथन होणार आहे. १) धोके व परताव्याचे सिद्धांत २) डॉ. मनमोहन सिंह यांचे अर्थशास्त्रीय विचार आणि ३) महाराष्ट्रातील व्यसनाधीनतेचे सामाजिक व आर्थिक पैलू या विषयावर विचारमंथन होणार आहे. या तीनही चर्चासत्रात आलेल्या शोधनिबंधाचे प्रकाशन व वाचन केले जाणार आहे. तसेच परिषदेच्या अध्यक्षांच्या वतीने ऐनवेळीच्या विषयावरील चर्चेसाठी “अमेरिकेचे प्रशुल्क धोरण : भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने व संधी” या विषयावर चर्चा घडवून आणली जाणार आहे. सदर परिषदेला महाराष्ट्रभरातून अर्थशास्त्रातील प्राध्यापकांची मोठ्या संख्येने ३ दिवस उपस्थिती असणार आहे. अधिवेशन दरम्यान होणाऱ्या व्याख्यान चर्चासत्र,परिसंवाद निवास व्यवस्था बैठक व्यवस्था अशा अनेक विषयांवर पत्रकार परिषद घेऊन चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ विलास खंदारे, कार्यवाह खजिनदार डॉ.मारोती तेगमपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. आशीष राऊत,प्रबंधक श्री राजेश गीते परिषदेच्या ४८ व्या अधिवेशनाचे स्थानिक कार्यवाह प्रा. धनंजय काळे,प्रा डॉ संजय पोहरे अर्थशास्त्र विभागातील डॉ. प्राजक्ता पोहरे, डॉ. उमेश घोडेस्वार व श्री. रोहन बुंदेले यांची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त येथे ☝️ पाहावे...


0 टिप्पण्या