Ticker

6/recent/ticker-posts

विविध पक्षातील मान्यवरांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश

विविध पक्षातील मान्यवरांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश


बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रवेश कार्यक्रम
प्रतिनिधी नागोराव तायडे 
बुलढाणा | दिनांक ४ सप्टेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा कार्यालयात विविध पक्षातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला.

प्रमुख मान्यवरांचा सहभाग

या प्रवेश सोहळ्यात प्रामुख्याने –

मंगेश गावंडे (तालुका अध्यक्ष, अकोला – स्वाभिमानी शेतकरी संघटना)

मोहम्मद शहाबुद्दीन ब्रम्ही (काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचे भाचे, माजी विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस पदाधिकारी)

माजी सरपंच – शरद पवार गट, समशेरपूर

रमेश चिंचे – सालतवाडा, प्रविण खोत तसेच सुरज ठोकळ – मुर्तीजापुर
यांचा समावेश आहे.



शहाबुद्दीन ब्रम्हींची उल्लेखनीय भूमिका

मोहम्मद शहाबुद्दीन हे तरुण नेतृत्व, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे संघटनेला नव्या उर्जेचा व उत्साहाचा लाभ होणार आहे.


प्रवेश घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले –
“क्रांतिकारी शेतकरी संघटना ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. ही संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अथक परिश्रम घेऊ.”या प्रसंगी समद रियाज, राहुल वानखडे, शुभम जवंजाळ, रामदास भगत, चंद्रशेखर गवळी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रवेशामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ताकद अधिक वृद्धिंगत होऊन ग्रामीण भागात संघटनेचे काम जोमाने होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या