Ticker

6/recent/ticker-posts

ऑटो चालकाने केला मुलीचा विनयभंग

ऑटो चालकाने केला मुलीचा विनयभंग


प्रतिनिधी नौशाद पटेल
अकोला : शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानक येथून आपल्या घराकडे ऑटोत बसून जात असताना आरोपी ऑटो चालकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिविल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ऑटोचालक जाफरखान सुभेदारखान याला अटक केली आहे.


अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अल्पवयीन मुलगी अकोला शहरात 'नीट' परीक्षेची तयारी करत आहे. तिने त्या अनुषंगाने खाजगी क्लासेस लावले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक येथून तिच्या रूमकडे एका ऑटोमध्ये बसून जात असताना सदर अल्पवयीन मुलीचा आरोपी ऑटो चालक जाफरखान सुभेदारखान याने अश्लील कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी सदर पीडित मुलीने सिविल लाईन पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी जाफरखान सुभेदारखान राहणार नायगाव याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या