समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा बांझ हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कलाकार ऍड. बाबा वानखडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
अकोला
सध्या समाजमान स्त्री संबंधी सकारात्मक आहे. तिला समजून घेतांना तिचा कोणताही अपमान होणार नाही याची काळजी, कायद्यानेही आणि समजूतदारपणा दाखवत मोठं मोठी विधाने केली जात असतानाही आजही शिक्षित युगात स्त्रीवर जुन्या काळापासून हिनवले जाते. त्यात गंभीर प्रकार म्हणजे स्त्री माता न होऊ शकणाऱ्या स्त्री ला वांझ आणि हिंदी भाषेत बांझ म्हटले जाते. याच विषयाला केंद्रबिंदू ठरवून टास्क फिल्म प्रस्तुत लेखक, दिग्दर्शक, निर्माता भीमपुत्र टेकसास गायकवाड यांनी *बांझ* या सिनेमाची निर्मिती केली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती याच सिनेमाचे कलाकार ऍड. बाबा वानखडे आणि संघपाल सिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
पूर्वी महिलेला मुलं होत नसल्याने तिला वांझ म्हणून समाजात हिंणवले जात होते. या हीनावण्यापूर्वी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नव्हती. किंवा तिची बाजू कुणीही ऐकून घ्यायला तयार नसत. मात्र आता याबाबत शिक्षितपणा आल्याचे दिसत असले तरीही अजूनही जातीयवादाची बळी देण्यासाठी अगदी उच्च शिक्षित अधिकाऱ्यांच्या घरात सुद्धा स्त्री मुलं जन्माला घालण्यासाठी सक्षम असूनही केवळ पुरुषी अहंकारामुळे शिक्षा देण्यासाठी असे प्रकार घडत असल्याचे *बांझ* या सिनेमांत दाखवण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा भाऊ बौध्द समाजाचा युवक उच्चवर्णीय युवतीच्या प्रेमात पडतो. त्यांच्या प्रेमाला प्रारंभी स्विकारल्याचे दाखवले जाते मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्याच समाजातील उच्च शिक्षित श्रीमंत मुलगा भुजंगराव सोबत लग्न करण्यात येते पण व्यसनी असल्यामुळे त्यांच्यात मुलं निर्मिती करण्याची क्षमता राहत नाही पण त्याची शिक्षा फक्त त्याच्या पत्नीला दिली जाते. ती बांझ आहे म्हणून तिला हिनवले जात तिचा घटस्फोट घेतला जातो. त्यानंतर ती जगण्यासाठी धडपड करीत असताना एका जिल्हाधिकारी यांच्या घरात धुणी भांडी करण्याचे काम करते. त्या काळात जिल्हाधिकारी यांचा भाऊ मुका असल्यामुळे घरातच असतात. ते त्या मोलकरीण ला मदत करीत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.आणि याकाळात निसर्ग आपले काम करत असते. तिला दिवस जातात आणि तिच्यावर लागलेला कलंक बांझ पुसला जात असतानाच तिच्या मनाविरुद्ध घरचे तिचा गर्भपात करण्यासाठी दवाखान्यात नेऊन गर्भापात केला जातो आणि तिच्यावर लावलेला कलंक कायम ठेवाण्यासाठी सगळे प्रयत्न केले जात असल्याचे दाखवण्यात आले आहेत. या सिनेमा ची शूटिंग पूर्ण झाली असून दसऱ्याच्या पर्वावर प्रदर्शित होत असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बांझ हा सिनेमा येत आहे. या सिनेमा मध्ये अकोल्याच्या कलाकार करूणा सिरसाट यांचे हस्ते चित्रपटाचे मंगल शॉट करून उदघाटन करण्यात आले, यावेळी राजविलास वानखडे, करुणा सिरसाट, राहुल जाधव, विनायक गोपणारायन, प्रभाकर कवडे , राजेश खांडेकर, संजय मेश्राम , प्रा . सुरेश मोरे , सम्यक वानखडे, आझाद, यांची उपस्थिती होती. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतुन चित्रपट अभिनेते ऍड. बाबा वानखडे व संघपाल सिरसाट यांनी दिली आहे.
हे आहेत कलाकार चित्रपटामध्ये मुख्य कलाकार कशिश खंडेलवाल , प्रबुद्धकुमार, भीमदास आरु, आनंदकुमार, डॉ. किर्तीपाल, भारत भगत, रंजना भीमराव, मंदाकिनी भोसले, धर्मपाल तंतरपाळे, किशोर गायकवाड, मंगल नागमोडे, राहुलकुमार, मीना सुरेश, अंजली खांडेकर, करुणा सिरसाट, सुरेश गायकवाड, विजय किशन, संजय सायरे, कल्याण श्रावस्ती, संघपाल सिरसाट, ऍड. बाबा वानखडे, आणि भिमपुत्र टेक्सास गायकवाड हे आहेत,
आम आदमी पक्षाच्या वतीने महानगरध्यक्ष अल्हाद मसूद अहेमद खान यांच्या नेतृत्वात मनपा समोर 7 जुलै पासून उपोषण सुरु करण्यात आले. दरम्यान मनपा चे अधिकाऱ्यांनी मंडपात येऊन उपायुक्त गीता ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा निरोप दिला. त्यावरून उपायुक्त यांची भेट करून चर्चा केली असता ती चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरु होते तर मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवाण्याचा निश्चय आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी केला आहे.


0 टिप्पण्या