Ticker

6/recent/ticker-posts

गाय-गोऱ्यांची निर्दयी कत्तल रोखली; तरी मुर्तीजापुरातील तस्करीचं सुळसुळाट का थांबत नाही?

गाय-गोऱ्यांची निर्दयी कत्तल रोखली; तरी मुर्तीजापुरातील तस्करीचं सुळसुळाट का थांबत नाही?


मुर्तीजापूर, 29 जून 
(प्रतिनिधी): संतोष माने 
आज सकाळी मुर्तीजापुरात टाटा एस (MH04-HY-7279) या वाहनातून अमानुषपणे बांधून नेली जात असलेली एक गाय व दोन गोरे पोलिसांनी तडाखेबंद कारवाईत वाचवली. जावेद खान (२८) व मोहम्मद नासीर (३२) या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करत गोवंश जनावरांना पुंडलिक महाराज गो-रक्षण संस्थेत दाखल करण्यात आले आहे.


पण हाच प्रश्न आता पेटत आहे – जिल्हा पेटवणाऱ्या या अवैध तस्करीचा ठावठिकाणा अजूनही मोडून काढला गेला नाही!
बाळापूर, पातूर, अकोट, तेल्हारा व मुर्तीजापुर परिसरात धडाडीने सुरू असलेल्या या कत्तलखान्यांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवरही पोलीस दलाने अनेक कारवाया केल्या, नवीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी झडत्या घेतल्या गेल्या. आमदार हरीश पिंपळे यांनीदेखील याविरोधात एकदा विधानसभेत ठामपणे आवाज उठवला होता. प्रशासनाने वेळोवेळी बैठकांमधून अंमलबजावणीसाठी सूचना केल्या.


तरीही हे थांबत नाही! आणि हीच बाब मन हेलावून टाकणारी आहे. कायद्याच्या, श्रद्धेच्या, समाजाच्या आणि धर्मभावनांच्या अधर्मकारक तुकड्यांवर सुरु असलेली ही छेडछाड थांबविण्याची आता वेळ आली आहे. आजची कारवाई पो.नि. अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. गणेश सूर्यवंशी, नितीन राठोड, पोहवा सुरेश पांडे, सचिन दुबे, गजानन खेडकर, ज्ञानेश्वर राणे, जिवन अंभोरे व सहकाऱ्यांनी अत्यंत तडफेने पार पाडली.परंतु ही केवळ सुरुवात आहे!
कारवाया कितीही झाल्या तरी जर कत्तलखाने सुरूच राहिले – तर हे थांबणार कधी? कायद्याच्या नावाने चाललेला हा खेळ बंद करण्यासाठी आता कर्तव्यदक्ष यंत्रणा, कडक शिक्षा आणि आक्रमक पावलं अनिवार्य झाली आहेत.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या