भाजपच्या वतीने जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रशांत हजारी यांचा सत्कार, आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते संपन्न
प्रतिनिधी नागोराव तायडे
मुर्तिजापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे नव्याने अविरोध निवडून आलेले अध्यक्ष प्रशांत हजारी यांचा सत्कार करण्यात आला.प्रशांत हजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी दूध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील विविध भागांमध्ये नवीन दूध संकलन केंद्रे सुरू करून अधिकाधिक शेतकरी व युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला आहे.
हा सत्कार आमदार हरीश पिंपळे यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापक गोविंदराव आगे, तसेच भाजपचे नेते व पदाधिकारी राम खंडारे, सुधीर दुबे, योगेश फुरसुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशांत हजारी यांच्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार व दुग्ध व्यवसायास चालना देण्याच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
0 टिप्पण्या