अकोला काँग्रेसतर्फे मशाल रॅली रद्द : विमान दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली
अकोला : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अकोला शहरातील नियोजित मशाल रॅली रद्द करण्यात आली. या दुर्घटनेत १७० हून अधिक जण मृत्युमुखी पडले किंवा गंभीर जखमी झाले आहेत. मृतांप्रती शोक व्यक्त करत अकोला काँग्रेसने श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, अकोला शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, अकोला ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अशोकराव अमानकर, नेते हेमंत देशमुख, माजी तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख, अकोला पश्चिम ब्लॉक अध्यक्ष गणेशराव कळसकर, मुर्तिजापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ जोगदंड, अकोला तालुका अध्यक्ष मो. खालिद, कपिलराव देव, अशरफ पठाण, काका अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष मो. इरफान, मो. मोईन (मंटूभाई), भगवान बोईत, सोहेल आर्किटेक्ट, सेवादल अध्यक्ष तशवर पटेल, मो. मोईन, कलीमभाई, प्रशांत कडु, पदमाकर वासनिक, शुभम धीमे, आशीष सोनवणे, सुनील घावट, मयूर पखाली, सुमेध डोंगरे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितांनी विमान दुर्घटनेतील मृतांप्रती दोन मिनिटांचे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.


0 टिप्पण्या