Ticker

6/recent/ticker-posts

वरिष्ठ उपसंपादकाची मुलगी जिल्ह्यात नोएल स्कूलची प्रतीक्षा प्रमोद गावंडे दहावी सीबीएसई परीक्षेत जिल्ह्यात तृतीय ९८. २० टक्के गुण मि‌ळवत शाळेतून अव्वल

वरिष्ठ उपसंपादकाची मुलगी जिल्ह्यात नोएल स्कूलची प्रतीक्षा प्रमोद गावंडे दहावी सीबीएसई परीक्षेत जिल्ह्यात तृतीय ९८. २० टक्के गुण मि‌ळवत शाळेतून अव्वल


अकोला

अकोला येथील नोएल स्कूलच्या सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. शाळेतून प्रतीक्षा प्रमोद गावंडे ही ९८.२० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. ती ‘सीबीएसई’ शाळांच्या निकालाच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून तृतीय आली आहे. अकोल्याच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची तृपांशा जैन (९९.२०) व आर्या आडगावकर (९९.००) टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिल्या व द्वितीय आल्या आहेत. तर प्रभात किड्सच्या श्रावणी महल्ले व जान्हवी देशमुख या (९७.८०) टक्के गुण मिळवून जिल्ह्यात चतुर्थ आल्या आहेत.
नोएल स्कूल ‘सीबीएसई’ मधील ९५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणारे शाळेचे टॉपर पाच विद्यार्थी असेः प्रथम प्रतीक्षा प्रमोद गावंडे (९८.२० टक्के) प्रतीक्षाही दै दिव्य मराठी चे उपसंपादक , प्रमोद गोवंडे यांची मुलगी आहे.


द्वितीय वैशाली वासुदेव लांडे (९७.२०), तृतीय अंजली धीरज शर्मा (९७.०० टक्के), चतुर्थ-लक्ष आशिष उपाध्याय (९६.४० टक्के), चतुर्थ एंजल अनिल बोदवडे (९६.४० टक्के), पाचवा क्रमांक वेदांत महेश कातखेडे -९४.८० टक्के) हे यश मिळवण्यासाठी, शाळेचे व्यवस्थापक अनोश विजय मनवर, प्राचार्या रूपाली कुकडे, उपप्राचार्य राजेश चवरे, शाळेचे शिक्षक स्मिता जुमडे, छाया सावरकर, राकेश थापा, कुलदीप देशमुख, वैष्णवी राऊत, रेखा शर्मा, नितीन वेरूळकर आणि सोनिया पहुरकर यांनी प्रयत्न केले..
प्रतीक्षा ही दैनिक दिव्य मराठी च्याअकोला आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक प्रमोद गावंडे यांची मुलगी आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या