महात्मा गांधी अस्थि विसर्जन स्मृतिदिनानिमित्त सर्वोदय व्यसनमुक्ती संवाद यात्रा
अकोला-- महात्मा गांधी अस्थि विसर्जन स्मृती दिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने 12 फेब्रुवारी 2025 रोजी गांधीग्राम पंचक्रोशीत सर्वोदय व्यसनमुक्ती संवाद यात्राआयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत महात्मा गांधीजींच्या 18 कलमी कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यात येईल. नशाबंदी मंडळाचे वतीने फिरते नशाबंदी व्यसनमुक्ती प्रदर्शनी ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे.सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड, सचिव डॉक्टर मिलिंद निवाणे,ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार , प्रा. राजाभाऊ देशमुख, श्रीकृष्ण विखे ,महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. शि.ना. ठाकूर ,कापूस ते कापड अभियान प्रमुख प्रल्हादराव नेमाडे, राष्ट्रीय एकात्मता अभियानाचे साहेबराव पाटील तायडे, सुमित्रा निखाडे,विठ्ठलराव हिवरे,हिम्मतराव गावंडे,पत्रकार अनिल मावळे आदी मंडळी पर्यावरण जनजागृती विषयक मार्गदर्शन करतील. महात्मा गांधी विद्यालयातील महात्मा गांधींच्या स्मारकावर सूतमाला अर्पण करून पूर्णा नदी घाटा पर्यंत रॅली काढण्यात येईल. पूर्णा नदी घाटावर गंगाजल पूजन, सर्वधर्म प्रार्थना व व्यसनमुक्ती संकल्पनेने कार्यक्रमाची सांगता होईल.
0 टिप्पण्या