Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त शिक्षकांकडून माजी विद्यार्थी शेतकरी युवा नेते पुर्णाजी खोडके यांचा सत्कार

सेवानिवृत्त शिक्षकांकडून माजी विद्यार्थी शेतकरी युवा नेते पुर्णाजी खोडके यांचा सत्कार


पूर्णाजी चे करावे तेवढे कौतुक कमीच- सेवानिवृत्त शिक्षक भानुदास पेटे



अकोला: जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथिल दै दिव्य मराठी चे पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके हे गेल्या चार वर्षापासून मी निस्वार्थपणे गोरगरीब, अपंग शेतकरी बांधव निराधार विद्यार्थी यांच्या विविध प्रश्न संदर्भात पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे माध्यमातून अनेकांना अनेक विषयासंदर्भात आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे... आतापर्यंत त्यांच्या विविध केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आहेत ‌‌.. असे कोणते काम नाही की त्यांनी जे काम विषयी आवाज उठवला ते काम झाले नाही... मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून असलेले. महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील तरुण रयत शेतकर संघटनेचे युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके महाराष्ट्रात त्यांच्या कार्याने कामाने चर्चेत असतात.. आतापर्यंत त्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी विद्यार्थी निराधार गोरगरीब नागरिक त्यांच्या विविध प्रश्नसंदर्भात आवाज उठून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.... जशी की चोहोट्टा बाजार येथे रुग्णवाहिका या संदर्भात सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.. ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र चोहोट्टा बाजार येथे या करिता सुद्धा मागण्या वरिष्ठांकडे सुरू आहे .. एसटी बंद सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी कठीण परिश्रमानंतर अकोला ते चोहोट्टा बाजार पारळा भाबेरी तेल्हारा पाच महिन्यापासून बंद असलेली एसटी बस सेवा. त्यांनी सुरू केले.. अनेक प्रश्न मार्गी लावली.... दि 26 जानेवारी 2025 रोजी , अकोट तालुक्यातील, त्यांच्या जन्म मूळ गावी. त्यांच्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धामणा बु येथे, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, माजी विद्यार्थी पूर्णाजी खोडके यांचा कामाची दखल घेऊन त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन, त्यांचे शिक्षक सेवानिवृत्त, शिक्षक भानुदास पेटे गुरुजी यांनी त्याचा, शाल श्रीफळ व नारळ देऊन सत्कार केला.


26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, यावेळेस ते बोलताना म्हणाले, पूर्णाजी चे करावे तेवढे. कौतुक कमीच आहे... आज मला आनंद होत आहे.. माझा विद्यार्थी. शेतकरी अपंग निराधार गौर गरीबांच्या साठी लढून त्यांना न्याय मिळवून देत आहे. मला खूप अभिमान होत आहे.. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.. यावेळेस डोळ्यात अश्रू आले.यावेळेस सेवानिवृत्त शिक्षक भानुदास पेटे यांनी बोलताना सांगितले.व लहान पणाच्या गोष्टी आठवून दिल्या यावेळेस जिल्हा परिषद शाळा चे मुख्याध्यापक उमेश लगड सर,शिक्षक रविंद्र सोळंके सर, गणेश बोबडे,सर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वंदना आढे, उपाध्यक्षा. दिपा बद्रे,सदस्य, पुज्या कळसकर, रोहनी गोरले,संतोष आढे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय वारे,शुभम आढे, अमोल मोरे, निलेश गोरे, वैभव गोरले, योगेश गोरले, राजेश गोरले,पवन बद्रे, अंगणवाडी सेविका, वनिता पेठे, गावच्या आशा सेविका अरुणा गोरले, अर्चना गोरले लक्ष्मी आढे, सह विद्यार्थी विद्यार्थिनी सह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते...


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या